- July 3, 2023
- No Comment
वाहतुक पोलीस प्रशासनाच्या ढसाळ कारभारामुळे खडकवासला धरण परिसरातील नागरिक,पर्यटक त्रस्त
पुणे;संपुर्ण महाराष्ट्र राज्यातून खडकवासला परिसरात पर्यटक पावसाळ्यात येत असतात.नुकताच पानशेत पर्यंत रस्त्याचे रुंदीकरण तथा कॉक्रीटीकरण झाल्याने कमी वेळात खडकवासला,सिंहगड, पानशेत पाहता येतात.एका पट्टय़ात हे तीन पर्यटन ठिकाण असल्या कारणाने पुणेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून पर्यटकांची गर्दी होते.नैसर्गिक परिसर असल्याने पर्यटकांच्या पसंतीला खरे उतरले आहे.धरण पट्टय़ात सामान्य नागरिक ही चहा,नाश्ता,मक्याची कणसे,विकून अर्थाजन करीत असतात.
परंतु वाहतुक पोलीस प्रशासनाच्या ढसाळ कारभारामुळे व नियोजनाच्या अभावानेमुळे खडकवासला धरण परिसरात पर्यटक त्रस्त झाल्याचे पाहण्यात आले.महाराष्ट्र क्राईम वॉच ने केलेल्या पाहणीत डोणजे ते खडकवासला धरणापर्यंत एकही वाहतूक पोलीस कर्मचारी आढळून आला नाही.खडकवासला चौकात दोघे जण दिशा दाखवत होते परंतु तिथपर्यंत पोहचायला नागरिकांना तसेच पर्यटकांना पावसात किती वेळ कसरत करावी लागली असेल त्याची जराशीही कल्पना नसेल