• July 4, 2023
  • No Comment

पोलिसात तक्रार दिल्याने हल्ल्याचा प्रयत्न

पोलिसात तक्रार दिल्याने हल्ल्याचा प्रयत्न

    वाकड: पोलिसात तक्रार दिल्याचा राग मनात धरून तरुणावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ही घटना डांगे चौक, थेरगाव येथे घडली.

    शिवम सिकंदर सिंग (वय 32, रा. डांगे चौक, थेरगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विशाल दामोदर पिल्ले (वय 24), सोहम दिनेश पाटील (वय 21, दोघेही रा. डांगे चौक, थेरगाव) आणि त्याचा एक साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पिल्ले आणि पाटील यांच्या विरोधात फिर्यादी शिवम याने पोलिसांना तक्रार दिली होती. याचा राग मनात धरून आरोपींनी आपसांत संगनमत करून शनिवारी रात्री सव्वाआठ वाजताच्या सुमारास डांगे चौक, थेरगाव येथे फिर्यादी शिवम यांना शिवीगाळ करीत हाताने व लाथा-बुक्‍क्‍याने मारहाण करण्यात आली.

    त्यानंतर आरोपी पिल्ले याने फिर्यादी यांच्या डोक्‍यावर चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र फिर्यादी यांनी तो वार चुकविला. जर त्यांच्या डोक्‍यावर वार झाला असता तर त्यांचा जीवही गेला असता त्यांची कल्पना आरोपी पिल्ले याला असूनही त्याने हे कृत्य केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *