• July 4, 2023
  • No Comment

वाहनांची तोडफोड व लुटमार करणाऱ्यास अटक

वाहनांची तोडफोड व लुटमार करणाऱ्यास अटक

    चिखली: गाड्यांची तोडफोड करत दहशत पसरविण्याचा प्रयत्न झाला. त्यातील एकाला पोलिसांनी अटक करून त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट एकने केली.

    आदर्श गौतम खंडारे (वय 19, रा. जाधववाडी, चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी शवप्पा काशिनाथ अरवत्तु (वय 25, रा. जाधववाडी, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे.

    पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या टेम्पो मध्ये (एमएच14/केए 5746) झोपले होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी दगडाने व कोयत्याने गाडीच्या काचा फोडल्या. फिर्यादीवर जिवघेणा हल्ला करत जबर जखमी केले. तसेच सुभाष दिगंबर भोसले (वय 52) हे त्यांच्या बस (एमएच 14/सीडब्ल्यू 2906) मध्ये असताना त्यांच्याही गाडीच्या काचा फोडून त्यांना हाताने मारहाण करत खिशातील 200 रुपये आरोपींनी हिसकावून नेले.

    गुन्हे शाखेने तिघांना पकडले असून त्यांना पुढील कारवाईसाठी चिखली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

    सदरची कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस अंमलदार शिवाजी कानडे, बाळासाहेब कोकाटे, सोमनाथ बोऱ्हाडे, महादेव जावळे, मनोजकुमार कमले, फारूक मुल्ला, अमित खानविलकर, गणेश महाडिक, सचिन मोरे, उमाकांत सरवदे, प्रमोद हिरळकर, अजित रूपनवर, प्रमोद गर्जे, मारोती जायभाये, तानाजी पानसरे, स्वप्नील महाले यांनी केली.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *