• July 7, 2023
  • No Comment

वैमनस्यातून आंदेकर टोळीतील सराइतांनी तरुणावर कोयत्याने वार

वैमनस्यातून आंदेकर टोळीतील सराइतांनी तरुणावर कोयत्याने वार

    पुणे: वैमनस्यातून आंदेकर टोळीतील सराइतांनी तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना नाना पेठेत घडली. अरबाज सैफुद्दीन शेख (वय २८, रा. नाना पेठ) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी आवेज अश्फाक सय्यद (वय २०), अमन युसूफ पठाण (वय २२), जयमेश शिंदे (वय २०, रा. टकार गल्ली, नाना पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत अरबाज शेख याने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अरबाज, त्याचे काका, कैलास बडेकर, विजय आंदेकर, फैजल शेख, विकी कांबळे नाना पेठेतील अशोक चौक परिसरातून निघाले होते. त्या वेळी आरोपी आवेज आणि अमनने अरबाजवर कोयत्याने वार केले. शिदेने अरबाजला बाटली फेकून मारली. पोलीस उपनिरीक्षक सुनील रणदिवे तपास करत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *