• July 7, 2023
  • No Comment

तोतया वन अधिकारी अटक

तोतया वन अधिकारी अटक

    पुणे : कल्याण नगर राष्ट्रीय महामार्गावर एक नवीन प्रकार समोर आला आहे. एका महाठगने रस्त्यावर उभा राहून वसुली सुरु केली. महामार्गावरुन जाणाऱ्या येणाऱ्या वाहनधारकांकडून तो पैसे वसूल करु लागला. वाहन धारकसुद्धा अधिकारी समजून त्यास पैसे देत होते. परंतु कधीतरी अपराध पूर्ण होतात. त्यानुसार तो ही पोलिसांच्या जाळ्यात आला. आता या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

    वन अधिकारी असल्याची बतावणी करून राजेंद्र हरिश्चंद्र गटकळ हा अनेक वाहनधारकाची फसवणूक करत होता. नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर जाणाऱ्या वाहनधारकांना अडवून तो पैशांची मागणी करत होता. एखाद्याकडे रोकड रक्कम नसली तर ‘फोन पे’ सुद्धा तो पैसे घेत होता. अगदी ३० हजारपर्यंत रक्कम वाहनधारकाकडून तो वसूल करत होता. त्याच्या या प्रकाराची माहिती ओतूर वन विभाग कार्यालयात गेली. वनविभागाने पोलिसांना या प्रकरणाची माहिती कळवली

    आरएफओ वैभव काकडे यांनी सांगितले की, आम्हाला राजेंद्र हरिश्चंद्र गटकळ संदर्भात तक्रार प्राप्त झाली. तो २८ आणि २९ जून रोजी नगर कल्याण महामार्गावर थांबला होता. त्यावेळी महामार्गावरुन जाणाऱ्या वाहनधारकाकडून पैशांची मागणी करत होता. पैसे न देणाऱ्यांवर कारवाईची मागणी करत होता.
    अगदी ३० हजार रुपयांपर्यंत रक्कम तो घेत होता. तो तोतया वन अधिकारी असल्याचे आम्हाला लक्षात आले. त्याची तक्रार ओतूर पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली. त्याच्यावर भारतीय दंड संहिता १८६० कलम ३८४ अंतर्गत खंडणीचा गुन्हा दाखल केला. त्याला अटक केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी त्याला दिली

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *