- July 7, 2023
- No Comment
आधार कार्ड हरवले आहे ? १४ अंकी नंबरही लक्षात नाही ? कसे कराल डाउनलोड

आधार कार्ड हे सगळ्या महत्त्वाच्या कागदपत्रांना जोडले गेले आहे त्यामुळे ते हरवले की, मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागते.
पण आता चिंता करण्याची गरज नाही. तुमचे आधारकार्ड हरवले असेल व १४ अंकी नंबरही लक्षात नसेल तरी आपण डिजिटल रुपात डाउनलोड करु शकतो. UIDAI ने अशी सुविधा दिली आहे की तुम्ही आधार क्रमांक न टाकता आधार कार्ड ऑनलाइन डाउनलोड करू शकता. कसे ते जाणून घेऊया.
1. या स्टेप फॉलो करा
तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाइट uidai.gov.in वर जावे लागेल.
यानंतर, होमपेजवर, तुम्हाला My Aadhaar टॅबखाली EID/Aadhaar नंबर Retrieve या पर्यायावर जावे लागेल.
यानंतर तुम्हाला एका नवीन टप्प्यावर रीडायरेक्ट केले जाईल जिथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक किंवा EID निवडावा लागेल.
त्यानंतर तुम्हाला तुमचे पूर्ण नाव, पिन कोड आणि कॅप्चा टाकावा लागेल.
Get One Time Password (OTP) बटणावर क्लिक करा. तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP मिळेल.
2. OTP टाका आणि सबमिट करा.
यानंतर तुमचा आधार क्रमांक तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठवला जाईल.
यानंतर तुम्हाला पुन्हा My Aadhaar टॅबवर जावे लागेल. त्यानंतर डाउनलोड आधार पर्यायावर जावे लागेल.
यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा टाकावा लागेल. त्यानंतर एक OTP येईल. ते टाकावे लागेल
यानंतर तुमचे आधार कार्ड पीडीएफ फाइल म्हणून डाउनलोड होईल.
आता आधार कार्ड उघडण्यासाठी तुम्हाला पासवर्ड टाकावा लागेल. यामध्ये तुम्हाला तुमच्या नावाची चार कॅपिटल अक्षरे आणि जन्माचे वर्ष एकत्र लिहावे लागेल आणि तुमचे आधार कार्ड ओपन होईल.