- July 28, 2023
- No Comment
उल्हासनगररात जुन्या रागातून चाकूने हल्ला
ऊल्हासनगर : कॅम्प नं-१, सत्यम मेडिकल गल्लीत जुन्या रागातून शिवलाल बाबूलाल गोटवाल यांच्यावर आदर्श गौडा व कृष्णा यादव यांनी चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून शिवलाल यांच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहे.
उल्हासनगर साधुबेला शाळा परिसरात राहणाऱ्या शिवलाल बाबूलाल गोटवाल यांचे काही दिवसांपूर्वी आदर्श शिवलिंग गौडा व कुष्णा दिपक यादव यांच्या सोबत भांडण झाले होते. बुधवारी रात्री साडे अकरा वाजता सत्यम मेडिकल गल्लीत लघुशंका करीत असतांना तेथे आदर्श व कुष्णा तेथे आल्यावर जुन्या रागातून त्यांनी शिवलाल याच्यावर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केले. शिवलाल याच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू असून उल्हासनगर पोलिसांनी आदर्श गौडा व कृष्णा यादव यांच्यावर भांदवी कलम ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
