- July 17, 2023
- No Comment
मावळात परप्रांतीय मजुराचा खुन,दोघांना बेड्या

मावळ :मावळातील धामनधार स्मशानभूमीच्या बाजूच्या ओढ्यामध्ये पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता.पोलिसांच्या तपासा अंतर्गत आढळून आले की हा मृत्यु नैसर्गिक नसुन त्याचा खून झाला आहे.या प्रकरणी खुनातील दोन आरोपीना अटक करण्यात आली आहे.विकास मारुती कोळी,वय-23,गणपत किसन कोळी वय-30,दोन्ही रा.आपटी धामनधरा, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .मृताची ओळख पटलेली नाही,अधिक माहितीसाठी लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन शी व सहा.पोलीस निरीक्षक निलेश माने यांच्याशी
संपर्क करावा




