- July 12, 2023
- No Comment
पाच ते सहा जणांच्या टोळीने केला चुलतभावांवर तलवारीने हल्ला

केडगाव: जगताप वस्ती नजीक पाच ते सहा जणांच्या टोळीने चुलतभावांवर तलवारीने हल्ला केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. यामध्ये हर्षल गायकवाड व राहुल गायकवाड (दोघे रा. केडगाव ता. दौंड ) गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर केडगाव येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, हर्षल व राहुल गायकवाड या दोघांना सायंकाळी सलमान याच्यासह अन्य चार ते पाच जणांनी फ्लॅटमध्ये बोलावले होते. त्याठिकाणीच या दोघांवर टोळीने तलवारीने हल्ला केला.
संबंधित घटना पैशाच्या कारणावरून घडल्याचे समजते. हल्लेखोर हे केडगाव परिसरातील असून त्यांना जखमींनी ओळखले आहे. यवत पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. यावेळी दौंडचे उपविभागीय अधिकारी स्वप्नील जाधव तसेच यवत पोलीस स्टेशनचे निरीक्षक हेमंत शेडगे उपस्थित होते. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदण्याचे काम चालू होते.




