• August 20, 2023
  • No Comment

विमा पॉलिसी सुरू करण्याच्या बहाण्याने चोरट्यांकडून पॅथोलॅाजिस्ट महिलेची १६ लाखांची फसवणूक

विमा पॉलिसी सुरू करण्याच्या बहाण्याने चोरट्यांकडून पॅथोलॅाजिस्ट महिलेची १६ लाखांची फसवणूक

    पुणे: विमा पॉलिसी सुरू करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी एका रोगनिदान प्रयोगशाळेतील तज्ज्ञ महिलेची १६ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    आरोपी शर्मा, रोहित मेहता यांच्यासह साथीदारांविरुद्ध माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ५० वर्षीय महिलेने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला रोगनिदान करणाऱ्या प्रयोगशाळेत तज्ज्ञ आहेत. त्या सेनापती बापट रस्ता परिसरात राहायला आहेत. महिलेने एका नामांकित कंपनीची विमा पॉलिसी काढली होती. हप्ते न भरल्याने पॉलिसी बंद पडली होती. बंद पडलेली पॉलिसी पुन्हा सुरू करून देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला होता. वर्षभरात पॉलिसीतून चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून चोरट्यांनी महिलेला जाळ्यात ओढले.

    महिलेकडून वेळोवेळी १६ लाख ३८ हजार रुपये चोरट्यांनी ऑनलाइन पद्धतीने घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण तपास करत आहेत

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *