• August 21, 2023
  • No Comment

पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर रितेश कुमार यांनी शहरातील गुंड टोळ्यांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यावर भर

पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर रितेश कुमार यांनी शहरातील गुंड टोळ्यांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यावर भर

    पुणे: पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर रितेश कुमार यांनी शहरातील गुंड टोळ्यांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये मोक्का कारवाई करण्यावर भर दिला. पोलीस आयुक्तांच्या आदेशाने आतापर्यंत शहरातील ५० गुंड टोळ्यांविरुद्ध मोक्का कारवाई करण्यात आली आहे.
    धानोरीतील गुंड अभिषेक उर्फ अभि रमेश तांबे याच्यासह दोन साथीदारांविरुद्ध पोलीस आयुक्तांनी मोक्का कारवाईचे आदेश दिले आहेत. अभिषेक तांबे (वय २१, रा. मुंजाबा वस्ती, धानोरी), सुमीत नागेश लंगडे (वय २५, रा. बर्माशेल, इंदिरानगर, लोहगाव रस्ता), प्रज्वल प्रशांत शिंदे (वय १८, रा. तिरुपती एनक्लेव्ह, धानोरी रस्ता) अशी मोक्का कारवाई केलेल्यांची नावे आहेत. तांबे आणि साथीदारांनी एका तरुणावर कोयत्याने वार करुन त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला होता. तांबे आणि साथीदारांविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत

    तांबे आणि साथीदारांविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, उपनिरीक्षक कांचन जाधव, रवींद्रकुमार वारंगुळे, सचिन माळी, सचिन शिंदे आदींनी तयार केला होता. या प्रस्तावाची पडताळणी अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा, उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी केली. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी तांबे आणि साथीदारांविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचे आदेश दिले. सहायक आयुक्त संजय पाटील तपास करत आहेत.

    Related post

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधले

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी…

    मुंबई: दि. १ जुलै : अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटनेच्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे…
    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *