- August 22, 2023
- No Comment
पुणे पोलिसांकडून आठ महिन्यात 297 आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई
पुणे: पुणे क्राईम हा सध्याचा चर्चेचा विषय बनला आहे अकारण कोयता गँगची दहशत, भर रस्त्यावर टोळक्याकडून होणाऱे खून यामुळे पुणे पोलिसांवर चांगलाच दबाव निर्माण झाला आहे.
यामुळे पोलिसांनी शहरातील गुन्होगारी टोळ्यांच्या मुस्क्या आवळण्यासाठी कंबर कसली आहे. ज्याचाच एक भाग म्हणून जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीत 50 टोळीतील एकूण 297 जणांवर मोका अंतर्गत कारवाई कऱण्यात आली आहे.
हत्यारांचा धाक दाखवून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणे, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, बेकायदा शस्त्र बाळगणे, मालमत्तेचे नुकसान, पोलिसांच्या आदेशाचा भंग करणे अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे करणाऱ्या टोळीतील गुन्हेगारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली जाते. या गुन्ह्यात जामीन मिळण्यास दीड ते दोन वर्षांचा कालावधी जातो.
महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार आणि धोकादायक व्यक्तींच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम म्हणजे ‘एमपीडीए’ कायद्यांतर्गत 40 गुन्हेगारांना एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध केले. सार्वजनिक व्यवस्थेस बाधा आणणे, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी करणाऱ्यांवर ‘एमपीडीए’ कायद्यांतर्गत कारवाई केली जाते. संबंधित गुन्हेगारास एक वर्ष जामीन मिळत नाही.
पोलिसांची कारवाई जरी सुरु असली तरी पुण्यातील गुन्हेगारीची मालिका काही थांबण्याचे चिन्ह दिसत नाही कारण जुलै महिन्यातच टोळक्याने दोन जणांचे निर्घूण खून केलेले आहेत. त्यामुळे पोलिसांना ही कारवाई आणखी कठोर करणे गरजेचे आहे.