- August 22, 2023
- No Comment
‘हे हडपसर गाव आहे इथे दुनियादारी नाही गुन्हेगारी चालते’ व्हिडीओ व्हायरल होताच पुणे पोलिसांनी दाखवला हिसका,रील बहाद्दर बादशहाचा तोरा असा उतरवला
आज रोजी युनिट ६ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे सोशल मीडियावर गुन्हेगारी आशयाचे स्टेटस ठेवणारा इसम पवन भारती याचा शोध घेत असताना *पो ना 7317 नितीन मुंढे* यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फतीने सदर इसम हा
शिंदेवस्ती, इंडस्ट्रियल एरिया, हडपसर, पुणे या ठिकाणी थांबला असले बाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर माहितीची खातरजमा करुन वपोनि रजनीश निर्मल यांना कळविले असता त्यांनी सदर इसमास ताब्यात घेऊन त्याचेकडे चौकशी करणेबाबत आदेशित केले असता सदर इसमास ताब्यात घेऊन नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव *पवन संतोष भारती वय २० वर्षे रा. तरवडे वस्ती, मोहम्मदवाडी, पुणे* असे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात एक लोखंडी कोयता मिळून आल्याने त्याचेविरुद्ध वानवडी पोलीस स्टेशन गु र नं – 1237/ 2023 भा हत्यारबंदी कायदा कलम ४(२५) सह म पो का कलम ३७(१)(३),१३५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मा. श्री रामनाथ पोकळे (अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे), मा. श्री अमोल झेंडे (पोलीस उप आयुक्त गुन्हे), श्री मा. सतीश गोवेकर (सहा.पोलीस आयुक्त सो गुन्हे 2) या वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल, पोलीस उप निरिक्षक सुरेश जायभाय, पो हवा मच्छिंद्र वाळके,पो ना विठ्ठल खेडकर, नितीन मुंढे, संभाजी सकटे, रमेश मेमाने, ऋषीकेश व्यवहारे, सचिन पवार या पथकाने केलेली आहे.
https://nitya-garden-resort.business.site/