• August 22, 2023
  • No Comment

प्रेमाच्या जाळ्यात ओढत महिला व्यावसायिकाचा लैंगिक छळ आणि फसवणूक

प्रेमाच्या जाळ्यात ओढत महिला व्यावसायिकाचा लैंगिक छळ आणि फसवणूक

    प्रेमाच्या जाळ्यात ओढत महिला व्यावसायिकाचा लैंगिक छळ आणि फसवणूक केल्याची धक्कादायक घटना अंधेरी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सिद्धार्थ दिलीप मेहता असे अटक आरोपीचे नाव आहे. आरोपीवर जुहू, खार पोलीस ठाणे आणि आर्थिक गुन्हे शाखेत फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. आरोपीने महिलेची शेअर मार्केटमध्ये चांगला परतावा मिळवून देण्याच्या नावाखाली महिलेला 70 लाख रुपयांचा गंडा घातला. पोलीस आरोपीची अधिक चौकशी करत आहेत.
    पीडित महिला आणि आरोपीची डिसेंबर 2022 मध्ये एका कॉमन फ्रेंडद्वारे ओळख झाली होती. आरोपीने आपण शेअर ब्रोकर असून वर्सोवा येथे राहत असल्याचे सांगितले होते. काही दिवसांनी आरोपी आणि पीडितेमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. मेहता याने प्रेमसंबंधाचा फायदा घेत पीडितेवर अनेकदा लैंगिक अत्याचार केले. तसेच शेअर मार्केटमध्ये दुप्पट परतावा मिळवून देण्याच्या बहाण्याने गुंतवणूक करण्यास भाग पाडले. पीडितेने 70 लाख रुपये आरोपीच्या सांगण्यावरुन गुंतवले.

    सुरवातीला मेहताने समाधानकारक परतावा दिला, मात्र नंतर परतावा देणे बंद केले. काही दिवसांनी महिलेने आरोपीकडे लग्नाबाबत विचारले असता त्याने टाळाटाळ करण्यास सुरवात केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने ओशिवरा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. यानंतर सखोल चौकशीनंतर मेहता यांच्यावर लैंगिक छळ, फसवणूक, गैरवर्तन आणि धमकावणे असे गुन्हे दाखल करण्यात आले. आरोपी त्यानंतर फरार झाला होता.मात्र वांद्रे युनिट 9 च्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी गिरगाव येथून पकडले आणि त्यानंतर पुढील चौकशीसाठी त्याला ओशिवरा पोलिसांच्या ताब्यात दिले. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *