• August 22, 2023
  • No Comment

पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आला. हा फोन दहशतवादी असल्याचा संदेश देणारा होता

पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आला. हा फोन दहशतवादी असल्याचा संदेश देणारा होता

    पुणे शहर दहशवाद्यांच्या रडारवर आहे. पुण्यात दोन दहशवादी सापडल्यानंतर दहशतवाद्यांची एक साखळीच कार्यरत असल्याचे वक्तव्य पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. तसेच या सर्व प्रकारांमुळे एनआयएचे लक्ष पुणे शहरावर केंद्रीत झाले आहे. पुण्यातील अशी संवेदनशील परिस्थिती असताना पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला अमेरिकेतून फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने दहशतवादी असल्याची माहिती दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपास सुरु केला आहे. या फोनमधील सत्य उघड करण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

    पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन आला. फोनवरील व्यक्तीने मुंबईत राहणारा एक व्यक्ती अतिरेकी असल्याचे सांगून फोन कट केला. मुंबई आणि पुणे शहरात नुकतेच दहशतवादी सापडले होते. या घटनांचा पार्श्वभूमीवर पोलिसांनी हा फोन गांभीर्याने घेतला आहे. पुणे पोलिसांनी याबाबतची माहिती लागलीच मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला दिली आहे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाने संबधित फोन करणाऱ्या व्यक्तीचे लोकेशन तपासले असता ते अमेरिकेचे निघाले. यामुळे फोन अमेरिकेतूनच आल्याचे स्पष्ट झाले आहे.

    पुणे पोलिसांना आलेला हा फोन अमेरिकेतून आल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु फोन करणाऱ्याने पूर्ण माहिती दिली नाही. फक्त मुंबईत दहशवतवादी असल्याचे सांगत फोन कट केला. यामुळे माहिती देणाऱ्याने खोडसाळपणा केला की सत्य सांगितले, हे तपासानंतर स्पष्ट होणार आहे. आता मुंबई पोलीस यासंदर्भात केंद्रीय संस्थांची मदत घेण्याची शक्यता आहे. केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत अमेरिकेतील त्या फोनचे गुढ बाहेर काढले जाणार आहे

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *