• August 24, 2023
  • No Comment

विमानतळ परिसरात दहशत माजवणाऱ्या चिक्या गायकवाड व त्याच्या इतर 2 साथीदारांवर ‘मोक्का’!

विमानतळ परिसरात दहशत माजवणाऱ्या चिक्या गायकवाड व त्याच्या इतर 2 साथीदारांवर ‘मोक्का’!

    विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत हातगाडी लावणाऱ्यांना दमदाटी करुन जबरदस्तीने पैसे लुटणाऱ्या प्रसाद उर्फ चिक्या संपत गायकवाड व त्याच्या इतर दोन साथीदारांवर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आतापर्यंत 52 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे.

    टोळी प्रमुख प्रसाद उर्फ चिक्या संपत गायकवाड (वय-25 रा. महादेवनगर, वडगाव शेरी, पुणे), अरबाज अयुब पटेल (वय-24 रा. नागपुर चाळ, येरवडा), बबलु संतोष चव्हाण (वय-22 रा. संजय पार्क, विमाननगर, पुणे) यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. आरोपींनी हातगाडी लावणाऱ्या विक्रेत्याला दमदाटी करुन गल्ल्यातील तीन हजार रुपये जरदस्तीने काढून नेले होते. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात आयपीसी 392, 352, 427, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    आरोपी पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून टोळी प्रमुख चिक्या गायकवाड याच्यावर 8 गुन्हे दाखल आहेत. तर अरबाज पटेल याच्यावर 6 आणि बबलु चव्हाण याच्यावर 4 गुन्हे दाखल आहेत. आरोपींनी गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व तसेच दहशत निर्माण करण्यासाठी गंभीर दुखापत, जबरी चोरी, दरोडा, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, घातक शस्त्र बाळगणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे केले आहेत. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यांनी अशा प्रकारचे गुन्हे वारंवार केले आहेत.

    विमानतळ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3 (1)(ii), 3(2), 3(4) चा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा यांना सादर केला होता. या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली. पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील करीत आहेत.

    पोलिस आयुक्तांनी आतापर्यंत तब्बल 52 संघटित गुन्हेगारी टोळयांवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केलेली आहे.आगामी काळात देखील अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार आहे.

    ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिकअपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख
    सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली
    वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे पोलीस निरीक्षक गुन्हे संगिता माळी
    सहायक पोलीस निरीक्षक मिलींद पाठक पोलीस उपनिरीक्षक एस.एस. कोळ्ळुरे पोलीस अंमलदार उमेश धेंडे, भोर, शिंदे यांच्या पथकाने केली.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *