• August 24, 2023
  • No Comment

अबब..तब्बल सत्तावीस लाखांची युवकाची फसवणूक,हडपसरमध्ये त्या टोळीविरुद्ध दुसरा गुन्हा दाखल

अबब..तब्बल सत्तावीस लाखांची युवकाची फसवणूक,हडपसरमध्ये त्या टोळीविरुद्ध दुसरा गुन्हा दाखल

    हडपसर : फायनान्सच्या गाड्या कमी किमतीत देतो म्हणून हडपसरमधील युवकांना फसविल्याबाबत अटक असलेल्या उबाळे टोळीच्या विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात अजून एक फसणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने हडपसर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.या टोळीत मुख्य आरोपी प्रफुल उबाळे,त्याची आई कमल उबाळे,सहकारी सुभाष रसाळ आणि वाहन चालक अविनाश कदम या चौघांच्या विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल असून ते त्या गुन्ह्यात तुरुंगात होते.बुधवारी (दि.२३)गणेश नामदेव कोरे (रा.साडे सतरा नळी, हडपसर) यांनी या टोळीविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पहिल्या गुन्हातून जामीन झाल्यावर त्यांना हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
    याबाबत सविस्तर वृत्त असे की,गणेश कोरे व त्याचा व्यवसायातील भागीदार प्रदीप मोरे यांचा हडपसर येथे केटरिंग व्यवसाय आहे.भविष्यात त्यांना जुन्या वाहनांचा खरेदी विक्रीचा व्यवसाय करायचा विचार होता.त्यामुळे ते याविषयी माहिती घेत होते.त्यावेळी त्यांचा लहानपणीचा मित्र अनिरुद्ध राऊत याने त्याच्या ओळखीच्या प्रफुल उबाळे नामक व्यक्तीकडे बुलेट गाडी विक्रीसाठी असल्याची माहिती दिली.कोरे यांच्या काकांना देखील बुलेट घ्यायची असल्याने त्यांनी ६५००० रुपये ऑनलाईन पदधतीने अनिरुद्ध च्या खात्यावर जमा केली तर अनिरुध्दने ती रक्कम उबाळे यांच्या खात्यावर पाठवली.परंतु पुढील आठवडा उबाळे यांनी बुलेट द्यायला टाळाटाळ केल्याने कोरे व त्यांचे काका यांनी उबाळे ची भेट घेतली.त्यावेळी उबाळे याने त्यांची रक्कम त्वरित माघारी केल्याने यांना उबाळेवर विश्वास निर्माण झाला.तसेच उबाळे याने तो श्रीराम फायनन्स मध्ये काम करतो व बँकेच्या गाड्या कमी दरात विकतो यासंदर्भात माहिती दिली. व एक दिवस कोरे यांना फोन करून त्याच्याकडे जुन्या बँकेच्या जप्त केलेल्या चारचाकी गाड्या आहेत याबाबत माहिती दिली.त्यासाठी हडपसर कॅनॉल जवळ सुभाष गॅरेज येथे भेटायला बोलवले.
    त्या ठिकाणी त्याने आमची त्याचे स्पॉन्सर सुभाष रसाळ व अविनाश कदम यांची ओळख करून दिली.त्यांनतर त्याने कोरे,प्रदीप मोरे व कोरे यांचे काका यांना नसरापूर येथील श्रीराम फायनान्सच्या गोडवून ला बोलावले. व तेथील काही गाड्या दाखवल्या. त्यातील काही गाड्या मी पसंत केल्या व आमच्या काकांनी एक गाडी घेतली. उबाळेच्या व्यवहारावर विश्वास झाल्यानंतर मी त्याच्याकडून काही गाड्या विकत घेतल्या. त्यानंतर मी उबाळे यांना सात वाहनांची मागणी केली त्या वाहनांच्या खरेदीसाठी एकूण २७,१२,५००उबाळे यांना ऑनलाईन रोख स्वरूपात दिली आहे. त्यानंतर वाहनांसाठी मी उबाळे यांना वारंवार संपर्क केला तर त्यांनी मला टाळाटाळ केली. तर एकदा त्याच्या फोनवरून त्यांच्या आईने मला खोटं ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. तर हडपसर येथील क्रिष्णा हॉटेलमध्ये उबाळे यांनी कोरे यांना सुभाष भाऊ तुझी विकेट टाकेल अशी धमकी दिल्याने कोरे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या टोळी विरोधात हडपसर पुणे आणि राज्यातून इतर ठिकाणाहून देखील फसवणुकीचे गुन्हे समोर याची शक्यता नागरिक बोलत आहेत. नागरीकांची अशा प्रकारे झाली असल्यास त्याची त्वरित हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *