• August 26, 2023
  • No Comment

अखेर सागर शिंदेच्या खूनाचा उलगडा; कीरकोळ कारणावरून मित्रांनीच केली हत्या

अखेर सागर शिंदेच्या खूनाचा उलगडा; कीरकोळ कारणावरून मित्रांनीच केली हत्या

     

    पिंपळे निलख: एकाच कारमधून प्रवास करत असताना झालेल्या वादानंतर दोघांनी त्यांच्या मित्राला पिस्तुलातून गोळी झाडत ठार मारले. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

    हा प्रकार भिशीच्या पैशांच्या वादातून झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

    सागर सर्जेराव शिंदे (रा. मधुबन सोसायटी, जुनी सांगवी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. योगेश जगताप आणि त्याच्या एका साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना बुधवारी (दि. 23) सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास पिंपळे निलख येथील रक्षक चौकात घडली.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सागर शिंदे आणि आरोपी हे मित्र आहेत. ते बुधवारी सायंकाळी एकाच कारमधून रक्षक चौकात आले. गाडीतच त्यांचा वाद झाला. आरोपींनी पिस्तुलातून सागर यांच्यावर गोळी झाडली. त्यात सागर यांचा मृत्यू झाला. भारत इलेक्ट्रिक कंपनीसमोर हा संपूर्ण प्रकार घडला.

    त्यानंतर आरोपी गाडीतून खाली उतरले. त्यांनी चौकात जाऊन एका दुचाकीस्वाराला अडवून त्याची दुचाकी घेऊन पळ काढला.

    घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावर पोलिसांना एक रिकामे काडतूस आढळून आले.

    त्यानंतर गुंडा विरोधी पथकाने एका आरोपीला ताब्यात घेतले. तर दरोडा विरोधी पथकाने दुसऱ्या आरोपीला ताब्यात घेतले.

    आरोपी आणि मयत सागर यांच्यात भिशीच्या पैशांवर वाद झाला आणि त्यातूनच त्याचा खून झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. सागर याच्यावर सन 2013 मध्ये चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. सोमनाथ वारे या युवकाच्या खून प्रकारात सागर आरोपी होता.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *