• August 26, 2023
  • No Comment

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर भर रस्त्यात कुऱ्हाडीचा वार; पत्नी गंभीर जखमी

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर भर रस्त्यात कुऱ्हाडीचा वार; पत्नी गंभीर जखमी

     

    पुणे: पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला ठार मारण्याच्या उद्देशाने तिच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. या घटनेत पत्नी गंभीर जखमी झाली आहे. पाषाण बाणेर लिंक रस्त्यावरील मॅग्नोलिया सोसायटीजवळ हा प्रकार घडला.

    चतु:र्श्रुंगी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    या घटनेत 38 वर्षीय पत्नी गंभीर जखमी झाली आहे. तर पती विठ्ठल सर्जेराव भोपळे (वय 40) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

    याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी आणि आरोपी पती-पत्नी आहेत. आरोपी पती हा फिर्यादीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. या कारणावरून दोघात वाद व्हायचे. दरम्यान बुधवारी रात्री फिर्यादी या बाणेर पाषाण लिंक रस्त्याने जात असताना आरोपीने कुऱ्हाडीने त्यांच्या डोक्यात वार करण्याचा प्रयत्न केला.

    मात्र फिर्यादीने तो हाताने अडवला. यात त्यांच्या उजव्या बोटाला जखम झाली. त्यानंतर आरोपीने डाव्या पायावरती देखील कुऱ्हाडीने वार करून जखमी केले आहे. चतु:शृंगी पोलीस अधिक तपास करत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *