• August 26, 2023
  • No Comment

चक्क सख्ख्या बहिणीच्याच घरात पतीसह बहिणीने केली चोरी

चक्क सख्ख्या बहिणीच्याच घरात पतीसह बहिणीने केली चोरी

     

    पुणे: सख्खी बहिण पतीसह नाशिक येथे गेली असताना तिच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत सख्ख्या बहिणीच्याच घरात चोरी करण्याचा प्रकार घडला आहे.

    याप्रकरणी सख्ख्या बहिणीसह तिच्या पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    बाणेरच्या सकाळ नगर येथील पुष्पहास बंगला येथे हा प्रकार घडला. चतु:र्श्रुंगी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    या प्रकरणी 53 वर्षीय महिला आणि तिचा पती सलीम उर्फ सालेम शेख (वय 53) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर 60 वर्षीय महिलेने याप्रकरणी तक्रार दिली आहे.

    या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी आणि आरोपी या दोघी सख्ख्या बहिणी आहेत. तर सलीम उर्फ सलीम शेख हा फिर्यादीचा दाजी आहे.

    हे सर्व सकाळ नगरमध्ये एकत्र राहतात. 27 जून ते 29 जून या काळात फिर्यादी या घराला कुलूप लावून नाशिक येथे त्यांच्या पतीसह गेल्या होत्या.

    यावेळी दोन्ही आरोपींनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि घरातील बेडरूममध्ये असलेल्या कपाटात ठेवलेले 18 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले.. चतु:शृंगी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *