• August 27, 2023
  • No Comment

लोणीकंद पोलिसांनी करुन दाखवलं! 48 तासात मित्राचा खून करणार्यांना केले अटक

लोणीकंद पोलिसांनी करुन दाखवलं! 48 तासात मित्राचा खून करणार्यांना केले अटक

    वाघोली : कामाचे पैसे न दिल्याच्या कारणावरून मित्राचा खून करणार्यां दोघांना लोणीकंद पोलीसानी 48 तासाच्या आत जेरबंद केले. वाघोलीतील केसनंद रोडवरील सिट्रॉन सोसायटी समोर समोरील लेबर कॅम्प मध्ये ही घटना घडली होती
    शैलेंद्र मंडगीकर याचा खून झाला होता. या प्रकरणी राम सुभाष श्रीरामे ( वय 22, मूळ रा नांदेड ) याला तुळजापूर येथून तर त्याचा मित्र गोपाल कोतलापुरे ( वय 26, मूळ रा नांदेड ) याला वाघोलीतील चोखीधानी परिसरातून अटक करण्यात आली. पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार, श्रीरामे, मंडगीकर व कोटलापुरे दारू पित बसले होते. त्यावेळी त्यांच्यामध्ये भांडणे झाली. दोघांनी शैलेंद्र याचा खून केला. त्यानंतर ते पळून गेले. खुनाचा गुन्हा दाखल झाल्यावर पोलीसानी त्यांच्या शोधार्थ दोन पथके तयार केली. श्रीरामे तुळजापूर येथे नातेवाईकांकडे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर एक पथक तेथे पोहचले. तेथे त्याला अटक करण्यात आली. तर कोतलापुरे हा पुन्हा वाघोलीत येणार असल्याची माहिती कर्मचारी रितेश काळे यांना मिळाली. त्यानुसार त्याला अटक करण्यात आली.परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे, पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) मारुती पाटील,
    सीमा ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे, गजानन जाधव, शिरीष भालेराव, सोमनाथ पडसळकर, निखिल पवार, उपनिरीक्षक राहुल कोळपे, सुरज गोरे, पोलीस कर्मचारी बाळासाहेब सकाटे, स्वप्नील जाधव, रितेश काळे, विनायक साळवे, सागर जगताप, मल्हारी सपुरे यांनी ही कामगिरी केली

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *