• August 27, 2023
  • No Comment

फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार

फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार

    पुणे : पुण्यात गुन्हेगारी वाढत आहे. त्यात कोण, कधी, काय करेल याचा नेम उरला नाही आहे. लहानपणीच्या मित्रानेत एका तरुणीसोबतच्या मैत्रीचा गैरफायदा घेतल्याचं समोर आलं आहे. फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार केला आहे. या घटनेमुळे विश्वास नेमका कोणावर ठेवायचा? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

    हा प्रकार चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला सून पीडित तरुणीच्या तक्रारीवरुन बीड जिल्ह्यातील तरुणावर गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चंदननगर परिसरात राहणाऱ्या 26 वर्षांच्या तरुणीने तक्रार दिली आहे. चंदननगर पोलिसांनी आसिफ रहीम शेख  (वय-26 रा. मुपो. पाडळी, ता. शिरुर, जि. बीड) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार एक दोन दिवस नाही तर जुलै 2022 ते 13 डिसेंबर 2022 या कालावधीत वाघोली येथील हॉटेलमध्ये घडला आहे आणि सोबतच आरोपीच्या भावाच्या घरी घडला आहे.

    ही तरुणी आणि आरोपी असलेला तरुण बालपणीचे मित्र आहेत. त्या मित्राने आपल्याच जवळच्या मैत्रिणीला तिचे आणि त्याचे काही फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली आणि तुझ्या मामाला ठार मारण्याचीदेखील धमकी दिली होती. त्यानंतर तिच्यावर वारंवार बलात्कार केला. काही महिने या तरुणाने तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *