• August 28, 2023
  • No Comment

अॅपल कंपनिचे २६६ मोबाईल फोन छतावरून प्रवेश करून चोरी आरोपी जेरबंद

अॅपल कंपनिचे २६६ मोबाईल फोन छतावरून प्रवेश करून चोरी आरोपी जेरबंद

    लोणीकंद केसनंद रोडवर असणा-या एका गोडावून मधुन एकूण अॅपल कंपनिचे २६६ मोबाईल फोन दि १७/७/२०२३ चे रात्रौ छतावरून प्रवेश करून चोरून नेण्यात आले होते. सदर घरफोडीच्या अनुशंगाने लोणीकंद पोलीस स्टेशनला गु.र.नं. ५८० / २०२३ भादवि कलम ४५४ ४५७ ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचे तपासात मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली  लोणीकंद पोलीस स्टेशनने वेगवेगळ्या प्रकारे तपास सुरु केला होता. सपोनि रविंद्र गोडसे व सपोनि गजानन जाधव याच्या नेतृत्वात वेगवेगळया ठिकाणी पथके पाठविण्यात आली होती रेकॉर्ड वरील गुन्हेगारांचा या अनुशंगाने शोध घेवुन त्यांचे कडे ही तपास करण्यात आला होता परंतु सर्व प्रकारे तपास करुनही सदरचा गुन्हा उघडकिस येण्यासाठी गुन्हयाची पद्धत आणि यापूर्वीच्या अशा प्रकारचे गुन्हे केलेल्या गुन्हेगारांच्या टोळक्याचा अभ्यास करताना अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये झारखंड मधील साहेबगंज जिल्ह्यातील काही टोळया सक्रीय असल्याची माहिती मिळाली त्यावरून त्या माहितीचे विश्लेषण करून त्या अनुशंगाने साहेबगंज जिल्ह्यातुन माहिती मिळवुन लोणीकंद पोस्टेचे सपोनि गजानन जाधव आणि पथक यांना राधानगर पोलीस स्टेशन साहेबगंज झारखंड च्या हद्दीत पाठविण्यात आले होते. त्यांनी सदर ठिकाणी तपास करून आरोपीतांचा शोध घेतला आणि आरोपी निष्पन्न केले परंतु सदरचे आरोपी हे पश्चिन बगलमध्ये परागंदा झालेले असल्यामुळे आरोपी हाती मिळाले नाहीत. लोणीकंद पोस्टेचे पोलीस नाईक अजित फरादे आणि अमोल ढोणे यांना पुन्हा तपासकामी साहेबगंज येथे पाठविले असता त्यांना यातील पाहिजे आरोपी नामे सलीम उर्फ असराउल इस्माईल फजल शेख, वय ३५ वर्षे, धंदा मजुरी, रा. मध्य पियारपुर, तहसिल उधवा थाना राधानगर, जिल्हा साहेबगंज, राज्य झारखंड यास सदर गुन्हयाचे तपासकामी अटक करून त्याचा ५ दिवसाचा ट्राझिस्ट रिमांड घेवुन  लोणीकद पोलीस स्टेशनला आणले आहे. सदर आरोपीकडे विचारपुस केल्यानंतर त्याने इतर चार सहकाऱ्यांचे मदतीने सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले असुन सदरचा गुन्हा त्यांनी कशाप्रकारे केला याची माहीती पोलीसांना दिलेली आहे. सदर गुन्हयातील चोरीला गेलेला मुद्देमाल हा टोळीचा म्होरक्या रबीऊल शेख याने पश्चिम बंगाल मधील एका एजंटच्या मार्फतीने विकला असल्याची माहीती सदर आरोपीने दिली असुन उर्वरीत आरोपींचा व चोरीचा माल घेणान्या इसमांचा पोलीसाकडुन शोध सुरु आहे. लवकरच त्याचा ठावठिकाणा माहीत करून त्यांना अटक केली जाईल असे वपोनि विश्वजित काइंगडे यांनी सांगितले.

    सदर गुन्हयामध्ये मा अपर पालीस आयुक्त रंजन कुमार शर्मा सो, पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे पो. सहा. पोलीस आयुक्त संजय पाटील सो, वरीष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइगडे सो लोणीकंद पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सपोनि रविंद्र गोडसे सपोनि गजानन जाधव पोलीस अमलदार स्वप्निल जाधव, कैलास साळुंके, अजित फरादे, अमोल ढोणे, साईनाथ रोकडे यांनी उपासाकामी परिश्रम घेतले असुन गुन्हयाचा पुढील तपास सपोनि जाधव हे करत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *