• August 28, 2023
  • No Comment

हॉटेलमध्ये जेवणाच्या बिलावर सर्व्हिस टॅक्स लावला;विचारणा केली. त्याचा राग त्यांना आला. हॉटेल मॅनेजर आणि हॉटेलच्या वेटरने मिळून त्या तरुणावर हल्ला

हॉटेलमध्ये जेवणाच्या बिलावर सर्व्हिस टॅक्स लावला;विचारणा केली. त्याचा राग त्यांना आला. हॉटेल मॅनेजर आणि हॉटेलच्या वेटरने मिळून त्या तरुणावर हल्ला

    पुणे शहरात हॉटेलमध्ये जेवण्यास गेलेल्या एका ग्राहकासोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. मित्रासह हॉटेलमध्ये गेलेल्या युवकाकडे जेवणानंतर बिल आले. त्यावर सर्व्हिस टॅक्स लावण्यात आल्याचे दिसले. मग त्याने यासंदर्भात हॉटेलच्या व्यवस्थापकाला विचारणा केली. त्याचा राग त्यांना आला. हॉटेल मॅनेजर आणि हॉटेलच्या वेटरने मिळून त्या तरुणावर हल्ला केला. या मारहाणीत तो तरुण जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

    पुणे शहरातील ३८ वर्षीय व्यावसायिक हुजेफा अत्तरवाला एनआयबीएम रस्त्यावर असलेल्या स्पाइस फॅक्टरी या हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. त्यांच्यासोबत त्यांचा मित्रही होते. जेवण झाल्यावर त्यांनी बिल मागवले. बिलाची एकूण रक्कम 2030 रुपये होती. या बिलात 176.50 रुपये सर्व्हिस टॅक्स लावला होता. त्यामुळे त्यांनी बिलिंग काऊंटला जाऊन हॉटेल मॅनेजरला विचारणा केली.

    मग भांडण अन् हाणामारी
    अत्तरवाला यांनी सर्विस टॅक्ससोबत विचारणा केल्यावर हॉटेल मॅनेजरला राग आला. त्यांनी अपमानास्पद शब्दांत त्यांना बोलण्यास सुरुवात केली. त्यांच्यातील शाब्दीक हल्ले वाढत राहिले. पुढे त्याचे रुपातंर हाणामारीत झाले. काचेच्या भांड्याने आणि बिअरच्या बाटलीने त्यांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीत अत्तरवाला यांना चांगलाच मार लागला. या प्रकरणी हॉटेल मॅनेजर जम्मेकर सामल, वेटर मौसम कुंवर याच्यासह 3 इतर वेटरवर कोंढवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
    अत्तरवाल यांच्यासोबत आलेले त्यांचे मित्र अनिकेत परदेशी आणि राम त्यागी यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी यांच्या डोक्यावर जड वस्तूने वार करण्यात आला, तर राम त्यागी यांच्या डोक्याला आणि उजव्या हाताच्या बोटाला धारदार शस्त्राने जखमा केल्या गेल्या. जखमी झालेले अत्तरवाल यांनी ससून रुग्णालयात उपचार घेतले. त्यानंतर एफआयआर दाखल करण्यात आला. मात्र, यावेळी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *