• August 28, 2023
  • No Comment

सॉफ्टवेअर इंजिनिअरचीही फसवणूक, सायबर भामट्यांनी अभियंत्यासह आठ जणांना कसे फसवले

सॉफ्टवेअर इंजिनिअरचीही फसवणूक, सायबर भामट्यांनी अभियंत्यासह आठ जणांना कसे फसवले

    राज्यात ऑनलाइन फसवणुकीचे अनेक प्रकार घडत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सायबर फसवणुकीच्या घटना वाढत आहेत. ऑनलाईन फसवणुकीत सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे उच्च शिक्षित लोकही अडकत आहेत. पुण्यात सायबर चोरट्यांनी चक्क महिला आयटी अभियंत्यासह आठ जणांची फसवणूक केली आहे. चांगल्या परताव्याचे लालच आणि टास्क देऊन ही फसवणूक झाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. सायबर फसवणुकीचे प्रकार वाढत असताना गुन्ह्यांचा तपास लागण्याचे प्रमाण नगण्य आहे. यामुळे खबरदारी बाळगणे गरजेचे आहे

    पुणे शहरातील ३६ वर्षीय महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरबाबत हा प्रकार घडला आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअरसह एकूण आठ जणांची 25.65 लाखांत फसवणूक झाली आहे. या प्रकरणी पुण्यातील चंदननगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी ते एप्रिल महिन्यात ही घटना घडली आहे. पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी सांगितले की, फिर्यादीला ऑनलाइन इन्कमसंदर्भात मोबाईलवर मेसेज आला. या कामाच्या बदल्यात चांगले उत्पन्न मिळणार असल्याचे फिर्यादीला सांगण्यात आले. मग सुरुवातील कामाच्या बदल्यात काही रक्कम दिली.

    अशी झाली फसवणूक
    फिर्यादीचा विश्वास संपादन केल्यानंतर अजून चांगले उत्पन्न हवे असल्यास गुंतवणूक करण्याचे सांगितले. महिला अभियंत्याने त्यांच्यावर विश्वास ठेवत 5.22 लाख रुपये दिलेल्या बँक खात्यात वर्ग केले. त्यानंतर अजून पैशांची मागणी होऊ लागली. आपण फसवले गेल्याचे त्यांना लक्षात आल्यावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर भामट्यांनी असाच प्रकार इतर काही जणांसोबत केला आहे

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *