• September 2, 2023
  • No Comment

पतीच्या कामाचे पेमेंट घेण्यासाठी कंपनीत गेलेल्या महिलेचा विनयभंग

पतीच्या कामाचे पेमेंट घेण्यासाठी कंपनीत गेलेल्या महिलेचा विनयभंग

    पुणे : पतीच्या कामाचे पेमेंट घेण्यासाठी कंपनीत गेलेल्या महिलेचा, तेथील बॉसने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एवढेच नव्हे तर त्याने तिला शिवीगाळही केल्याची माहिती समोर आली आहे. अमेय गुर्जर असे आरोपीचे नाव असून तो फ्युचर टेक कंपनीचा संचालक आहे. त्याने पीडित महिलेशी बोलताना गैर शब्दही वापरले. त्यानंतर ३१ वर्षीय पीडित महिलेने कोथरूड पोलिस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवली तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी अमेय गुर्जरविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला आता कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागत आहे. ही धक्कादायक घटना कोथरूडच्या मयूर कॉलनीतील फ्युचर टेक कंपनीच्या आवारात सोमवारी दुपारी दोन वाजता घडली

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा पती हा फ्युचर टेक कंपनीमध्ये काम करत होता. पीडत महिला व तिचा पती हे दोघेही त्याचा पगार घेण्यासाठी सोमवारी कंपनीत गेले होते. त्यावेळी कंपनीचे संचालक अमेय गुर्जर यांनी महिलेला उद्देशून अत्यंत आक्षेपार्ह शब्दांत टिपण्णी केली. त्याने फक्त तिला पैशांबद्दलच विचारले नाही तर तिच्या पतीने तिला पेमेंट घेण्यासाठी पाठवायला हवे होते, अशी हीन कमेंटही केली. त्याच्या आक्षेपार्ह शब्दांमुळे त्याचे चुकीचे हेतूही उघड झाले

    धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीने महिलेचा हात बळजबरीने पकडून तिला कार्यालयातून हाकलून दिले. त्यामध्ये तिची बांगडी तुटली व हातालाही दुखापत झाली. यानंतर संतप्त महिलेने पोलिस स्टेशनमध्ये जाऊन आरोपीविरोधात तक्रार नोंदवली. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत

    Related post

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन निवडणुकीत ८०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन निवडणुकीत ८०१ मतदार मतदानाचा हक्क…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे: गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या निवडणुकीत यंदा एकूण ८०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार…
    कसबा पेठेत न्यू गंधर्व बँडकडून अनधिकृत शेड व रस्त्यावर गाड्यांचे अतिक्रमण; नागरिक त्रस्त

    कसबा पेठेत न्यू गंधर्व बँडकडून अनधिकृत शेड व रस्त्यावर…

    पुण्यातील कसबा पेठ परिसरात न्यू गंधर्व बँड या व्यवसायिकाकडून अनधिकृत शेड उभारणे, डेकोरेशनचे साहित्य सार्वजनिक जागांवर अस्ताव्यस्त ठेवणे आणि बँडच्या गाड्या…
    अप्पर तहसील लोणी काळभोर येथे नागरिकांच्या आंदोलन.

    अप्पर तहसील लोणी काळभोर येथे नागरिकांच्या आंदोलन.

    पुणे: कदमवाकवस्ती गावामध्ये पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यासंदर्भात संबंधित प्रशासनाकडून नुकसानग्रस्तांचा पंचनामा देखील करण्यात आला…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *