• September 2, 2023
  • No Comment

पुणे : शिवाजीनगर न्यायालयातील कर्मचाऱ्याला लाच घेताना पकडले

पुणे : शिवाजीनगर न्यायालयातील कर्मचाऱ्याला लाच घेताना पकडले

    शिवाजीनगर दिवाणी न्यायालयातील कर्मचाऱ्याला एक हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी पकडले.लक्ष्मण नथू काळे (वय ४०) असे लाचखोर कर्मचाऱ्याचे नाव आहे. याबाबत एका महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी काळे याच्यासह आाणखी एकाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    तक्रारदार महिलेने जमिनीच्या वादासंदर्भात शिवाजीनगर न्यायालयात दावा दाखल केला आहे. या दाव्यात प्रतिवादी व्यक्तीला न्यायालयाने हजर राहण्यासाठी समन्स बजाविण्याची जबाबदारी काळे याच्यावर सोपविण्यात आली होती. समन्स वेळेत बजावून याबाबतचा अहवाल न्यायालयात सादर करण्यासाठी काळे याने महिलेकडे एक हजार रुपयांची लाच मागितली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरात सापळा लावून काळे याला महिलेकडून एक हजार रुपयांची लाच घेताना पकडले. पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *