• September 2, 2023
  • No Comment

आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिसांना सतर्कतेचे आदेश;पुण्यातील बंदोबस्तात वाढ

आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिसांना सतर्कतेचे आदेश;पुण्यातील बंदोबस्तात वाढ

    पुणे : जालन्यातील सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिसांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. या घटनेचे पडसाद शहरात उमटू नये म्हणून बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. जालन्यातील सराटी गावात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला गालबोट लागले
    पोलिसांनी शुक्रवारी आंदोलकांवर लाठीमार केल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. शहरात अनुचित घटना घडू नये म्हणून शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले आहेत.गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे यांनी गुन्हे शाखेच्या पथकांना संवेदनशील भागात गस्त घालण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस मुख्यालयात राखीव बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरात आयोजित केली जाणारी आंदोलनांची माहिती संकलित करण्यात येणार असून, महामार्गांवरील बंदोबस्तातही वाढ करण्यात आली आहे

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *