• September 2, 2023
  • No Comment

पुणे शहरातील शिक्षकाचा धक्कादायक प्रकार दहा वर्षाच्या दोन अल्पवयीन मुलींना पीटी शिकवताना आक्षेपार्ह स्पर्श अश्लील संभाषण

    पुणे : पुणे शहरातील शिक्षकाचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. शारीरिक शिक्षण म्हणजे पीटीचे धडे देता, देता या शिक्षकाने नसता उद्योग केला. घडलेला प्रकार अल्पवयीन विद्यार्थींनी घरी आल्यावर सांगितला. त्यानंतर हे प्रकरण सरळ पोलीस ठाण्यात गेले. पुण्यातील लोहगाव भागात घडलेल्या या प्रकारामुळे पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. आता शाळेच्या प्रशासनाकडून त्या शिक्षकावर कारवाई करण्यात येणार आहे.

    पुणे शहरातील लोहगाव परिसरातील केंद्रीय विद्यालय आहे. या केंद्रीय विद्यालयात संजय देशमुख शारीरिक शिक्षणाचे शिक्षक म्हणून कार्यरत आहे. संजय देशमुख याने शाळेतील दहा वर्षाच्या दोन अल्पवयीन मुलींना पीटी शिकवताना आक्षेपार्ह स्पर्श केला. तसेच अश्लील संभाषण केले. शाळेतील त्या मुलींनी हा प्रकार घरी सांगितला. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने शिक्षकाविरोधात तक्रार दिली. त्यानंतर शिक्षकावर विनयभंग आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    कधी घडला प्रकार
    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहगाव येथील केंद्रीय विद्यालयात १ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट या दरम्यान हा प्रकार घडला. शाळेत सुरु असलेल्या क्रीडा तासाच्यावेळी मैदानावर हा प्रकार घडला. क्रीडा शिक्षक संजय देशमुख याने मुलींचा विनयभंग केला. त्याने या मुलीना वाईट हेतून स्पर्श करत अश्लील संभाषण केले. नको त्या ठिकाणी स्पर्श करत ‘तुला पीटी क्लास कसा वाटतो’ असे विचारले. मुलींनी हा प्रकार घरी सांगितल्यावर पालकांनी थेट पोलीस ठाणे गाठत गुन्हा दाखल केला

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *