• September 3, 2023
  • No Comment

पुण्यात 1 कोटी 4 लाखांचा 520 किलो गांजा जप्त

पुण्यात 1 कोटी 4 लाखांचा 520 किलो गांजा जप्त

    पुणे : पुणे शहर ड्रग्जच्या विळख्यात असल्याचं मागील काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. आंध्रप्रदेशातून विक्रीसाठी आणलेला 1कोटी रुपयांचा 520 किलो गांजा जप्त केला आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक -2 ने मोठी कारवाई केली आहे आणि हा गांजा जप्त केला आहे. पुणे नगर रोडवरील अर्मसेल इंडिया कंपनीच्या समोर ही करण्यात आली

    संदीप बालाजी सोनटक्के (वय 29 रा. मुपो. दहिवली, पाली फाटा, खोपोली, ता. खालापुर, जि. रायगड), निर्मला कोटेश्वरी मुर्ती जुन्नुरी (वय-36 रा.चिलाकरलुपेठ, जि.गंटुर, राज्य आंध्रप्रदेश), महेश तुळशीराम परीट (वय-29 रा. तुपगाव पोस्ट चौक, ता. खालापूर, जि. रायगड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी पुणे नगर रोडवरील एक कार अडवली आणि शासनाचे कोणतेही लोकप्रतिनिधी नसल्याचं लक्षात आल्यावर झाडाझडती घेतली त्यावेळी गांजाची वाहतूक करत असल्याचं समोर आलं.

    महाराष्ट्र शासनाची पाटी लावून करत होते गांजाची वाहतूक

    अंमली पदार्थ विरोधी पथक दोनचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलींग करत होते. त्यावेळी पोलिसांना पांढऱ्या रंगाची सेलेरिओ कार आणि स्कॉर्पिओया वाहनांना महाराष्ट्र शासनाची पाटी लावून आंध्रप्रदेशातून मोठ्या प्रमाणात गांजा विक्रिसाठी आणला जात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी गाडीतील संदीप सोनटक्के आणि महिलेला ताब्यात घेतले. त्यानंतर दुसऱ्या कारला अडवून त्यांची तपासनी केली असता दोन्ही गाड्यांमध्ये गांजा सापडला. यामध्ये 1 कोटी 4 लाख 11 हजार रुपये किंमतीचा 520 किलो 550 ग्रॅम वजनाचा गांजा, 9 लाख रुपये किंमतीची स्कॉर्पिओ, 6 लाख रुपये किमतीची सेलीरीओ कार, 71 हजार रुपये किमतीचे चार मोबाईल व 200 रुपयांचा बोर्ड असा ऐवज जप्त केला आहे

    Related post

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल असा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या लेन्स कार्ड lenskart या कंपनीचा मनसे कडून जाहीर निषेध

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल…

    लोणी काळभोर: लेन्स कार्ड हे विवाद मध्ये सापडले आहे. कंपनीचे सीईओ पियुष बंसल यांनी ग्रुमिंग गाईड असा एक स्टेटमेंट काढले आहे.…
    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी विजय; अध्यक्षपदी गोरख मेंगडे

    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या निधनानंतर झालेल्या हमाल पंचायतच्या त्रैवार्षिक निवडणुकीत गोरख मेंगडे…
    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७ उमेदवार बिनविरोध, केळी विभागातील एका जागेकारिता मतदान.

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डातील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या अध्यक्षपदी सौरभ कुंजीर यांची बिनविरोध निवड…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *