• September 3, 2023
  • No Comment

लाकडी दांडके अन् पाईपने बेदम मारहाण करत लांबवली १५ तोळे सोन्याची चैन याप्रकरणी तिघांना अटक

लाकडी दांडके अन् पाईपने बेदम मारहाण करत लांबवली १५ तोळे सोन्याची चैन याप्रकरणी तिघांना अटक

    पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेदम मारहाण करून अज्ञात चोरट्यांनी १५ तोळे सोन्याची चैन लंपास केली होती. याप्रकरणी चाकण पोलिसांनी तीन जणांना बेड्या ठोकल्यात. मारहाण आणि गळ्यातील चैन चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणी श्रीराम संतोष होले, प्रतिक उर्फ बंटी दत्तात्रय टाळकर आणि बबलू रमेश टोपे या तिघांना चाकण पोलिसांनी अटक केली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सतीश गव्हाणे हे त्यांच्या इतर काही मित्रांसह चाकण गावच्या हद्दीत शिक्रापूर रोड लगत असलेल्या हॉटेलच्या ठिकाणी बसले होते. तेव्हा, तिन्ही आरोपींनी दुचाकीवर येऊन त्यांना थेट लाकडी दांडक्याने आणि पाईपने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. गळ्यातील सोन्याची चैन हिसकावली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. याप्रकरणी सतीश गव्हाणे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड आणि पोलीस उपनिरीक्षक विनोद शेंडकर यांच्या टीमने आरोपींचा शोध घेतला
    तिन्ही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकून त्यांच्याकडे असलेली १५ तोळे सोन्याची चैन आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा तीन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड पोलीस उपनिरीक्षक विनोद शेंडकर यांच्या टीमने केली आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *