• September 4, 2023
  • No Comment

खाऊचे अमिष दाखवून पाच वर्षांची मुलगी खेळत असताना अपहरण आरोपी अटक

खाऊचे अमिष दाखवून पाच वर्षांची मुलगी खेळत असताना अपहरण आरोपी अटक

    पिंपरी : पाच वर्षांची मुलगी खेळत असताना आपल्या घरापासून लांब गेली. त्यावेळी खाऊचे अमिष दाखवून तिला एक तरुण सोबत घेऊन चालला होता. मात्र, रस्त्याने चालणाऱ्या दोन नागरिकांना शंका आल्याने ते त्याला ते पोलिस ठाण्यात घेऊन गेले. त्यावेळी ती मुलगी त्याची परिचयाची नसल्याचे समोर आले. ही घटना शनिवारी चिंचवड येथे घडली. या प्रकरणी प्रकरणी मुलीच्या आईने चिंचवडपोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयित राजदीप रामआसारे राजपुत (वय २३, रा.थेरगाव, मुळगाव- मिरापुर, कोसंबी) याला अटक केली आहे

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या पाच वर्षीय मुलीला घराबाहेर खेळण्यास सोडून तिची आई सत्संगासाठी गेली होती. मुलगी खेळताना घरापासून लांब गेली. तिला संशयित राजदीप याने खाऊचे आमिष दाखवून आपल्यासोबत घेऊन जात होता. त्यावेळी रस्त्याने जाणाऱ्या दोन सजग नागरिकांना त्याचा संशय आला. ते त्याला आणि मुलीला घेऊन चिंचवड पोलिस ठाण्यात आले. त्यावेळी सर्व प्रकार उघड झाला. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले असून मुलीला तिच्या आई-वडिलांकडे सुपूर्द केले आहे

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *