• September 4, 2023
  • No Comment

५० लाखांची खंडणी मागणाऱ्या सराइताला अटक

५० लाखांची खंडणी मागणाऱ्या सराइताला अटक

    पुणे : भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या हद्दीत मे महिन्यात कात्रज हायवेवरील आर्यन स्कूलजवळ पाच ते सहा जणांनी कार अडवून, चाकूचा धाक दाखवून ५० लाखांची खंडणी मागितली होती. तसेच व्हाॅटस्ॲपवर कॉल करून खंडणी नाही दिल्यास कुटुंबातील व्यक्तीला व फिर्यादीला जिवे मारण्याची देखील धमकी दिली होती.

    भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्या तपासावर असलेल्या दराेडा व वाहनचाेरी पथक एकमधील पाेलिस शिपाई श्रीकांत दगडे, सुमित ताकपेरे, महेश पाटील यांना फरारी आरोपी पानशेत येथील त्याच्या गावी येणार असल्याची माहिती मिळाली.

    त्यानुसार पोलिसांनी वरिष्ठांना कळवून पानशेत येथील राहत असणाऱ्या गावी जाऊन आरोपी राेहित पासलकर (वय २३, रा. रुळे माेरदरी, ता. वेल्हे) याला त्याच्या घरी रात्री सव्वा वाजता पकडले. ही कारवाई दरोडा व वाहनचोरीविरोधी पथक एकचे पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस शिपाई सुमित ताकपेरे, श्रीकांत दगडे, महेश पाटील यांनी केली

    Related post

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल असा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या लेन्स कार्ड lenskart या कंपनीचा मनसे कडून जाहीर निषेध

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल…

    लोणी काळभोर: लेन्स कार्ड हे विवाद मध्ये सापडले आहे. कंपनीचे सीईओ पियुष बंसल यांनी ग्रुमिंग गाईड असा एक स्टेटमेंट काढले आहे.…
    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी विजय; अध्यक्षपदी गोरख मेंगडे

    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या निधनानंतर झालेल्या हमाल पंचायतच्या त्रैवार्षिक निवडणुकीत गोरख मेंगडे…
    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७ उमेदवार बिनविरोध, केळी विभागातील एका जागेकारिता मतदान.

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डातील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या अध्यक्षपदी सौरभ कुंजीर यांची बिनविरोध निवड…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *