• September 4, 2023
  • No Comment

आयपीएल सट्ट्यात हरलेले पैसे न दिल्याने व्यावसायिकाचे अपहरण या प्रकरणी लोणीकंद पोलिसांकडून दोघांना अटक

आयपीएल सट्ट्यात हरलेले पैसे न दिल्याने व्यावसायिकाचे अपहरण या प्रकरणी लोणीकंद पोलिसांकडून दोघांना अटक

    पुणे : आयपीएलमध्ये सट्ट्यात हरलेले सहा लाख रुपये न दिल्यामुळे ही रक्कम वसूल करण्यासाठी सट्टेबाजांनी एका व्यावसायिकाचे पुण्यातून अपहरण करून मारहाण केली. या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. हा प्रकार शनिवारी वाघोली येथील आव्हाळवाडी परिसरात घडला.
    नागेश एलमल्ली, आकाश बिराजदार (रा. सोलापूर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत आव्हाळवाडी येथील एका महिलेने लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या पतीचे ऑटो गॅरेज आहे. पतीने आयपीएल सट्ट्यात सहा लाख रुपये हरले होते. परंतु त्याने ही रक्कम सट्टेबाजांना दिली नव्हती. ही रक्कम वसूल करण्यासाठी आरोपी त्याच्या मागे लागले होते. आरोपींनी शनिवारी पहाटे महिलेच्या पतीचे मोटारीतून अपहरण केले. हरलेले सहा लाख रुपयांचे १० लाख रुपये मिळणार नाहीत, तोपर्यंत सोडणार नसल्याचे सांगत पतीला घरात डांबून मारहाण केली. याबाबत महिलेने लोणीकंद पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तपासादरम्यान आरोपी हे महिलेच्या पतीला सोलापूरला घेऊन गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावर पोलिसांनी तातडीने सोलापूरला जाऊन महिलेच्या पतीची सुटका केली

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *