- September 5, 2023
- No Comment
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१, गुन्हे शाखा पुणे यांनी खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस केले ४ तासात जेरबंद
केशव पार्क, उपविभाग, निलायम टॉकीज समोर, पर्वती, पुणे येथील MSEB मध्ये वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणुन नोकरीस असलेला गोपाळ कैलास मंडवे, वय – ३२ वर्षे, रा. ओवी आंगण कॉलनी, जाधव नगर, रायकर मळा, पुणे याचा सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे हद्दीत मनोहर गार्डन
जवळ, खंडोबा मंदीर रोड, रायकर मळा, पुणे येथे भरदिवसा धारदार हत्याराने अज्ञात इसमाने खुन केला असुन सदर अज्ञात इसमाचा मा वरिष्ठांनी शोध घेणेबाबत आदेशित केले होते. त्या अनुषंगाने इकडील पथकाकडील स्टाफला त्याबाबत अज्ञात आरोपीचा शोध घेणेबाबत पोलीस उप निरीक्षक शेख, पोलीस हवालदार २०६१ राठोड, पोना २८८ ताजणे व पोना ६९४२ जाधव यांना सुचना देवुन रवाना केले. त्याप्रमाणे इकडील पथकाकडील पोलीस नाईक २८८ धनंजय ताजणे यांना त्यांचे गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, वर नमुद गुन्ह्यातील अज्ञात इसम हा
एस. एन. डी. टी. कॉलेज समोर, कर्वे रोड, पुणे येथे थांबला असलेबाबत खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर बातमी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अशोक इंदलकर यांना कळविल्याने त्यांनी सदर बातमीचा आशय सांगितला असता त्यांनी सदर बातमीबाबत मा. वरिष्ठांना माहिती देवुन मा वरिष्ठांचे परवानगीने वर नमुद अधिकारी व अंमलदार यांना सदर ठिकाणी रवाना करुन अज्ञात इसम मिळुन येताच त्यास
ताब्यात घेवुन त्यास आमचे समक्ष हजर करणेबाबत आदेशित केले होते. प्राप्त बातमीचे अनुषंगाने पोलीस उप निरीक्षक शेख, पोलीस हवालदार २०६१ राठोड, पोना
२८८ ताजणे व पोना ६९४२ जाधव असे एस. एन. डी. टी. कॉलेज समोर, कर्वे रोड, पुणे येथे थांबुन पाहणी केली असता त्याबाबत आमची सर्वाची खात्री झाल्याने त्यास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने आपले नाव, पत्ता सिधांत दिलीप मांडवकर, वय १९ वर्षे, रा. सध्या धायरेश्वर
मंदीराजवळ, पोकळे वस्ती, अजिंक्य तारा मित्र मंडळ, स.नं. ५५ / ६, धायरी, पुणे असे असल्याचे सांगितले. त्यास अधिक विश्वासात घेवुन दाखल गुन्ह्याबाबत त्याचेकडे चौकशी करता त्याने दाखल गुन्ह्याची कबुली दिल्याने व दाखल गुन्ह्यामध्ये त्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर आरोपीस पुढील कार्यवाहीकरीता सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचे ताब्यात देण्यात आले आहे. सर गुन्ह्याचा पुढील तपास सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे शहर करीत आहेत.सदरची कारवाई पुणे शहरचे मा. पोलीस आयुक्त सो, श्री. रितेशकुमार, मा. पोलीस सह
आयुक्त सो, श्री. संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त गुन्हे मा. श्री अमोल झेंडे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे १ मा. श्री. सुनिल तांबे यांचे मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक – १, गुन्हे शाखा, चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक
इंदलकर, पोलीस उप निरीक्षक शाहीद शेख, पोलीस हवालदार प्रदीप राठोड, पोलीस नाईक धनंजय ताजणे, मॅगी जाधव व गणेश ढगे, पोलीस अंमलदार शिवाजी सातपुते व नारायण बनकर दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी केली आहे.