• September 5, 2023
  • No Comment

बलात्काराच्या गुन्ह्यातील एक आरोपी पोलिसांना हिसका देवून पसार

बलात्काराच्या गुन्ह्यातील एक आरोपी पोलिसांना हिसका देवून पसार

    पुणे : बलात्काराच्या गुन्ह्यातील एका आरोपीने पोलिसांना हिसका देवून पलायन केल्याची घटना हडपसर पोलिस ठाण्याच्या मगरपट्टा पोलिस चौकीत सोमवारी सायंकाळी घडली. या घटनेने शहर पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
    प्रीतम चंदुलाल ओसवाल (वय ३२, रा. उरुळी देवाची, ता. हवेली) असे त्या आरोपीचे नाव आहे. सहायक पोलिस आयुक्त संजय पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रीतम ओसवाल याच्याविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी ओसवाल याला ३१ ऑगस्ट रोजी अटक केली होती.तो सध्या पोलिस कोठडीत होता. पोलिसांनी त्याला गुन्ह्याच्या तपासासाठी आज सायंकाळी साडेसात वाजता मगरपट्टा पोलिस चौकीत नेले होते. त्यावेळी पोलिस कर्मचाऱ्यांना हिसका देवून तो पसार झाला. हडपसर पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *