- September 5, 2023
- No Comment
शत्रूच्या हल्ल्यात पुण्यातील जवान हवालदार दिलीप ओझरकर शहीद
वीर जवान दिलीप बाळासाहेब ओझरकर हे लढाई अपघातात कारगिल ते लेह दरम्यान प्रवास करताना शहीद झाले. ओझरकर हे हवालदार या पदावर अभिमानाने देश सेवेचे काम करत होते. पुण्यात भवानी पेठ येथे ते राहण्यास होते.
15 एप्रिल 2004 रोजी ते सेनेत भर्ती झाले होते. तर दीड ते दोन वर्षापूर्वीच ते सेवेतून निवृत्त ही झाले होते. मात्र त्यांनी पुन्हा कालावधी वाढवून देशसेवा करण्यास पसंती दिली. सराव मोहिमेसाठी जात असताना काल दि. 3 सप्टेंबर रोजी रविवारी दुपारी ३ वाजता त्यांच्या गाडीचा दुर्दैवी अपघात झाला. दुपारी 3:30 ते 4 वाजण्याच्या सुमारास ते शहीद झाल्याचे वृत्त त्यांच्या कुटुंबीयांना सायं 6 वाजता कळविण्यात आले. ते अवघे वय 38 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, 6 वर्षाचा मुलगा, 4 वर्षाची मुलगी व दोन भाऊ आहे. ते वर्षातून एकदा दहीहंडी व गणेशोत्सवाला आवर्जून येत होते.काल 3 सप्टेंबर रोजी सकाळीच त्यांचे लहान मुलांशी फोनवर संभाषण झाले होते. पप्पा कधी येणार तुम्ही अशी विचारणा सतत मुले करीत होती. वडिलांना ही व्हिडीओ कॉलद्वारे भारत पाकिस्तान सीमेवर असल्याचे त्यांनी दाखविले. त्याठिकाणी खूप थंडी असल्याचे ते बोलत होते. ओझरकर यांचे वडील एकमावळ येथे ओझरडी गावात शेती करतात. खूप हाल अपेष्टा सोसून मुलाला त्यांनी मुलाला सैन्यात भरती केले होते. अशी माहिती त्यांचा भाऊ रोहित ओझरकर यांनी दिली. त्यांच्या आकस्मित जाण्याने कुटुंबीयांवर मोठा डोंगर कोसळला आहे.आज रात्री लोहगाव विमानतळावर Flight no- AI-851 विमानाने त्यांचे पार्थिव आणण्यात येईल. उद्या सकाळी 8 वाजता शासकीय इतममात त्यांच्या पार्थिवावर धोबीघाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. ते शहीद झाल्याचे वृत्त समजताच संपूर्ण भवानी पेठ परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.