• September 5, 2023
  • No Comment

मुंबईतील पोलीस दलाच्या ‘फोर्स वन’ पथकातील पोलीस कर्मचाऱ्याने पोलीस निरीक्षक महिलेवर केला हल्ला

मुंबईतील पोलीस दलाच्या ‘फोर्स वन’ पथकातील पोलीस कर्मचाऱ्याने पोलीस निरीक्षक महिलेवर केला हल्ला

    पुणे : मुंबईतील पोलीस दलाच्या ‘फोर्स वन’ पथकातील पोलीस कर्मचाऱ्याने पोलीस निरीक्षक महिलेला मारहाण केल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील अभिरुची पोलीस चौकीच्या आवारात घडली. याप्रकरणी निलेश आंद्रेस भालेराव (रा. कलिना, सांताक्रुझ, मुंबई) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका महिला पोलीस निरीक्षकाने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी निलेश भालेराव मुंबईतील फोर्स वन पथकात नियुक्तीस आहे. तक्रारदार महिला पोलीस निरीक्षक या राज्य गुप्तवार्ता विभागात नियुक्तीस होत्या. २०१८ मध्ये भालेराव प्रशिक्षणासाठी आला होता. त्यावेळी त्याने पोलीस निरीक्षक महिलेशी वाद घातला होता. शासकीय कामात अडथळा, तसेच विनयभंग केल्याप्रकरणी भालेरावविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता
    पोलीस निरीक्षक महिलेने याबाबत वानवडी पोलीस ठाण्यात भालेरावविरुद्ध फिर्याद दिली होती. भालेरावच्या कुटुंबीयांनी पोलीस निरीक्षक महिलेला विनंती केली होती. विनंती केल्यानंतर भालेरावविरुद्ध दाखल केलेली तक्रार मागे घेण्यात आली होती. पोलीस निरीक्षक महिलेने गुन्हा मागे घेतल्यानंतर आरोपी भालेरावने पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केली. त्यामुळे पोलीस निरीक्षक महिला पतीसह सिंहगड रस्त्यावरील अभिरुची पोलीस चाैकीत तक्रार देण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी भालेराव तेथे आला. त्याने पोलीस निरीक्षक महिलेशी अभिरुची पोलीस चौकीच्या आवारात वाद घालून त्यांना धक्काबुक्की केली. भालेरावविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिसांनी विनयभंग, तसेच धक्काबुक्की प्रकरणी गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक भारत चंदनशिव तपास करत आहेत

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *