- September 5, 2023
- No Comment
पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत तस्करांना पकडले आहे. त्यांच्याकडून पाच कोटी रुपये किंमतीचा ऐवज जप्त
पुणे शहरात तस्करीचे प्रमाण वाढले आहे. कधी अंमलीपदार्थांची तस्करी होते तर कधी बंदी असलेल्या गोष्टींची तस्कारी केली जाते. आता बंदी असलेल्या व्हेल माशाच्या उलटीची विक्री करणाऱ्या आरोपीला डेक्कन पोलिसांनी जेरबंद केले आहे. विश्वनाथ रतन गायकवाड (38, रा. कात्रज खोपडेनगर, गुजरवाडी) या आरोपीकडून आंतराष्ट्रीय बाजारपेठेत पाच कोटींची किंमत असलेली व्हेल माशाची उलटी जप्त करण्यात आली. यापूर्वी नोव्हेंबर 2022 मध्ये देखील डेक्कन पोलिसांनी पाच कोटींची व्हेल माशांची उलटी जप्त केली होती. त्यावेळी पाच तस्करांना अटक केली होती. पुणे शहरातील फर्ग्युसन रस्त्यावरील गुडलक हॉटेलच्या मागे आरोपीला पकडले