• September 8, 2023
  • No Comment

दहा लाखांची लाच घेणाऱ्या मेडिकल कॉलेजच्या डिनवर मोठी कारवाई महापालिका सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय

दहा लाखांची लाच घेणाऱ्या मेडिकल कॉलेजच्या डिनवर मोठी कारवाई  महापालिका सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय

    पुणे महानगरपालिकेच्या वैद्यकिय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत असलेल्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात लाच घेण्याचा धक्कादायक प्रकार ऑगस्ट महिन्यात घडला होता. या संवेदनशील प्रकरणाची पुणे मनपाने गंभीर दखल घेतली. त्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमली होती. या समितीने दिलेल्या अहवालात वैद्यकीय महाविद्यालयाचा अधिष्ठाता आशिष बंगिनवार याला 10 लाखांची लाच घेतल्या प्रकरणी दोषी आढळले होते. त्यानंतर आता पुणे महानगरपालिकेने लाच घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये जबर बसणार अशी कारवाई केली आहे.

    पुणे मनपाच्या वैद्यकीय शिक्षण ट्रस्टच्या अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशासाठी १५ जागा व्यवस्थापन कोट्याच्या आहेत. व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी २१ लाख रुपये शुल्क आकारले जाते. हेच शुल्क अनिवासी भारतीय असल्यास त्यांच्याकडून ३५ लाख रुपये घेतले जाते. तसेच नियमित एमबीबीएस अभ्यासक्रमाचे प्रवेश शुल्क ७ लाख रुपये आहे. ज्या विद्यार्थ्यांचे नियमित कोट्यातून नंबर लागत नाही, त्या विद्यार्थ्यांना एनआरआय कोट्यातून प्रवेश घ्यावा, असे सांगितले जाते. एनआरआय कोट्यातून प्रवेश घेतल्यास पाच वर्षांसाठी सुमारे एक कोटीपेक्षा जास्त रक्कम जाते. त्यामुळे यावर तडजोड करून १६ ते २० लाख रुपये मागितले जातात. मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता आशिष बंगिनवार याने असाच फार्मूला वापरत १६ लाखांची लाच मागितली. त्यातील दहा लाख घेताना ८ ऑगस्ट रोजी पकडले गेले होते चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर अधिष्ठाता डॉ. आशिष बंगिनवार यांना महापालिका सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आला. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी हा निर्णय घेतला आहे. या कारवाईमुळे लाचखोर कर्मचाऱ्यांमध्ये जबर बसणार आहे.

    Related post

    समाजासाठी मोठं हृदय – कालिदास ढमढेरे यांची ५ लाखांची देणगी

    समाजासाठी मोठं हृदय – कालिदास ढमढेरे यांची ५ लाखांची…

    भीमनगर येथील गो-हे खुर्द येथे समाज मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर एक प्रेरणादायी घटना घडली आहे. स्थानिक उद्योजक मा. श्री. कालिदास (दादा)…
    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन निवडणुकीत ८०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन निवडणुकीत ८०१ मतदार मतदानाचा हक्क…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे: गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या निवडणुकीत यंदा एकूण ८०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार…
    कसबा पेठेत न्यू गंधर्व बँडकडून अनधिकृत शेड व रस्त्यावर गाड्यांचे अतिक्रमण; नागरिक त्रस्त

    कसबा पेठेत न्यू गंधर्व बँडकडून अनधिकृत शेड व रस्त्यावर…

    पुण्यातील कसबा पेठ परिसरात न्यू गंधर्व बँड या व्यवसायिकाकडून अनधिकृत शेड उभारणे, डेकोरेशनचे साहित्य सार्वजनिक जागांवर अस्ताव्यस्त ठेवणे आणि बँडच्या गाड्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *