• September 8, 2023
  • No Comment

कंपनीची ६६ लाखांची ऑनलाईन फसवणूक करणारा बिहारमध्ये जाऊन सायबर चोरट्याला जेरबंद

कंपनीची ६६ लाखांची ऑनलाईन फसवणूक करणारा बिहारमध्ये जाऊन सायबर चोरट्याला जेरबंद

    पुणे : पुण्यातील एका नामांकित कंपनीच्या कार्यालयात अकाऊंट विभागात काम करणाऱ्या व्यक्तीला संपर्क करुन एका सायबर चोरट्याने फसवणूक केल्याचा प्रकार घडला होता. कंपनीचा संचालक बाेलत असल्याचे सांगून विश्वास संपादन करुन खात्यावर ऑनलाईन ६६ लाख ४१ हजार रुपये पाठवले होते. याप्रकरणी पुणे सायबर पाेलीसांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करुन बिहारमध्ये जाऊन सायबर चोरट्याला जेरबंद केले
    बिशाल कुमार भरत मांझी (वय- २१, रा.लकरीखुर्द, सिवान, बिहार) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याने तक्रारदार यांना फाेन करुन नामांकित कंपनी इन्फिनिटी डेवर्ल्पस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा संचालक बाेलत असल्याचे भासवले. त्याद्वारे तक्रारदार यांचे कंपनीच्या खात्यातून तीन बँक खात्यावर एकूण ६६ लाख ४१ हजार रुपये पाठविण्यास भाग पाडले.सदर गुन्हयातील आरोपीने गुन्हा करताना वापरलेले माेबाईल क्रमांक, ईमेल आयडी व पेमेंट करण्यासाठी दिलेल्या लिंकचा व वेगवेगळ्या बँक खात्यांचा तांत्रिक तपास करुन त्याचा ठावठिकाणा शाेधून काढला. आरोपी बिहार राज्यात सिवान परिसरात राहत असल्याची माहिती निष्पन्न झाल्यावर सायबर पाेलीस पुणे यांचे एक पथक बिहार मध्ये जाऊन आराेपीचा शाेध घेऊन त्याला अटक केली. सदर आराेपींकडून पाेलीसांनी एक माेबाईल, वेगवेगळे सहा सिमकार्ड हस्तगत केले आहे

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *