• September 9, 2023
  • No Comment

लोणीकंद मध्ये हॉटेलच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्याव्यवसायाचा पोलिसांनी केला पर्दाफाश

लोणीकंद मध्ये हॉटेलच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्याव्यवसायाचा पोलिसांनी केला पर्दाफाश

    पुणे : हॉटेलच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्याव्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने थेट छापा टाकत कारवाई केली आहे. सहा तरुणी आणि काही महिलांची सुटका केली आहे. महत्वाचं म्हणजे, यात एका बांग्लादेशी तरुणीचाही समावेश आहे. लोणीकंद परिसरामधील मनोरा लॉजिंग अँड बोर्डिंग अँड रेस्टॉरंटमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे.

    प्रज्योत हिरीअण्णा हेगडे (वय 27, रा. पेरणे फाटा, लोणीकंद) आणि गिरीश शाम शेट्टी (वय 29) यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी सामाजिक सुरक्षा विभागाच्या महिला पोलीस कर्मचारी रेश्मा कंक यांनी तक्रार दिली आहे. लोणीकंद येथील हॉटेल मनोरामध्ये मोठ्या प्रमाणावर वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळाली होती. बनावट ग्राहक पाठवून खात्री करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. त्यानंतर या ठिकाणी छापा टाकत कारवाई करण्यात आली. सुटका करण्यात आलेल्या महिलांमध्ये तीन महिला या पश्चिम बंगालच्या असल्याची माहिती आहे.

    Related post

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन निवडणुकीत ८०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन निवडणुकीत ८०१ मतदार मतदानाचा हक्क…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे: गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या निवडणुकीत यंदा एकूण ८०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार…
    कसबा पेठेत न्यू गंधर्व बँडकडून अनधिकृत शेड व रस्त्यावर गाड्यांचे अतिक्रमण; नागरिक त्रस्त

    कसबा पेठेत न्यू गंधर्व बँडकडून अनधिकृत शेड व रस्त्यावर…

    पुण्यातील कसबा पेठ परिसरात न्यू गंधर्व बँड या व्यवसायिकाकडून अनधिकृत शेड उभारणे, डेकोरेशनचे साहित्य सार्वजनिक जागांवर अस्ताव्यस्त ठेवणे आणि बँडच्या गाड्या…
    अप्पर तहसील लोणी काळभोर येथे नागरिकांच्या आंदोलन.

    अप्पर तहसील लोणी काळभोर येथे नागरिकांच्या आंदोलन.

    पुणे: कदमवाकवस्ती गावामध्ये पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यासंदर्भात संबंधित प्रशासनाकडून नुकसानग्रस्तांचा पंचनामा देखील करण्यात आला…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *