• September 9, 2023
  • No Comment

दहीहंडी पाहत असताना धक्का लागल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणावर धारदार शस्त्राने वार

दहीहंडी पाहत असताना धक्का लागल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणावर धारदार शस्त्राने वार

    पुणे : पुण्यातील विविध परिसरात मोठ्या उत्साहात दहीहंडी पार पडली मात्र काही ठिकाणी दहीहंडी उत्सवाला गालबोल लागलं. दहीहंडी पाहत असताना धक्का लागल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले आहे. यात एक तरुण जखमी झाला आहे. ही घटना सिंहगड कॉलेज कॅम्पसमध्ये असलेल्या एमबीएन कॉलेज समोरील सार्वजनिक रस्त्यावर घडली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

    दहीहंडी पाहत असताना धक्का लागल्याने हा सगळा प्रकार घडला. प्रवीण लोंढे असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी ध्रुव विश्वास लंकेश्वर याने तक्रार दिली आहे. सिंहगड कॉलेज कॅम्पसमध्ये असलेल्या एनबीएन कॉलेज समोरील सार्वजनिक रस्त्यावर दहीहंडी पाहण्यासाठी गेले होते. त्यानंतर ध्रुव आणि त्याचा मित्र सुजल दहीहंडी उत्सवाचा कार्यक्रम संपल्यानंतर घरी निघाले होते. या दरम्यान रस्त्याने चालत असताना धक्का लागला आणि शिवीगाळ करून मारहाण करायला सुरुवात केली. आरोपीने मारहाण करत थेट धारदार शस्त्राने ध्रुव याच्या बरगडीवर वार करून जखमी केलं आहे.

    Related post

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन निवडणुकीत ८०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन निवडणुकीत ८०१ मतदार मतदानाचा हक्क…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे: गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या निवडणुकीत यंदा एकूण ८०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार…
    कसबा पेठेत न्यू गंधर्व बँडकडून अनधिकृत शेड व रस्त्यावर गाड्यांचे अतिक्रमण; नागरिक त्रस्त

    कसबा पेठेत न्यू गंधर्व बँडकडून अनधिकृत शेड व रस्त्यावर…

    पुण्यातील कसबा पेठ परिसरात न्यू गंधर्व बँड या व्यवसायिकाकडून अनधिकृत शेड उभारणे, डेकोरेशनचे साहित्य सार्वजनिक जागांवर अस्ताव्यस्त ठेवणे आणि बँडच्या गाड्या…
    अप्पर तहसील लोणी काळभोर येथे नागरिकांच्या आंदोलन.

    अप्पर तहसील लोणी काळभोर येथे नागरिकांच्या आंदोलन.

    पुणे: कदमवाकवस्ती गावामध्ये पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यासंदर्भात संबंधित प्रशासनाकडून नुकसानग्रस्तांचा पंचनामा देखील करण्यात आला…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *