• September 10, 2023
  • No Comment

झटपट पैसे कमाविण्यासाठी वायरमनने दुचाकी चोरीचे गुन्हे

झटपट पैसे कमाविण्यासाठी वायरमनने दुचाकी चोरीचे गुन्हे

    पुणे : झटपट पैसे कमाविण्यासाठी वायरमनने दुचाकी चोरीचे गुन्हे करण्यास सुरुवात केली. दुचाकी चोरुन पसार झालेल्या वायरमनला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. चोरट्याकडून पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या. कुणाल सुरेश बधे (वय २९, रा. रांजणे, ता. वेल्हा, जि. पुणे ) असे अटक करण्यात आलेल्या दुचाकी चोरट्याचे नाव आहे. भारती विद्यापीठ पोलिसांचे पथक कात्रज भागातील आंबेगाव परिसरात गस्त घालत होते. लिपाणे वस्ती भागात दुचाकी चोरटा थांबल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी संशयावरुन बधेला ताब्यात घेतले

    त्याची चौकशी करण्यात आली. तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. चौकशीत बधेने दुचाकी चोरल्याची कबुली दिली. बधे वायरमन आहे. झटपट पैसे कमाविण्यासाठी त्याने दुचाकी चोरीचे गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. बधे याच्याकडून पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, गुन्हे शाखेचे निरीक्षक विजय पुराणिक, सहायक निरीक्षक गिरीश दिघावकर, अमोल रसाळ, धीरज गुप्ता, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, हर्षल शिंदे, सचिन सरपाले आदींनी ही कामगिरी केली

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *