• September 12, 2023
  • No Comment

पुण्यात चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा घेतला जीव

पुण्यात चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा घेतला जीव

    पुणे शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील येरवडा परिसरात चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीची गळा चिरून निर्घृण हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, या दाम्पत्याच्या लग्नाला अवघे दीड वर्ष झाले होते. तर त्यांना सात महिन्याची मुलगी आहे मिळालेल्या माहितीनुसार, आशिष भोसले असे आरोपी पतीचे नाव असून त्याने आपली पत्नी रूपाली भोसले हिचा निर्घृण खून केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आशिष हॉटेलमध्ये साफ सफाईचे काम करतो तर रूपाली धुणे-भांडी करून घर चालवत होती
    अशिष हा रुपालीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय घेत होता. त्यातून दोघांमध्ये सतत भांडणे होतं असत. दरम्यान शनिवारी रात्री आशिषने जोरदार भांडण झालं. यावेळी आशिषने रुपालीला शिवीगाळ केली. तसेच आशिषने धारदार चाकूने पत्नीच्या गळ्यावर, मानेवर आणि पोटावर वार करून तिला जखमी केले. उपचारासाठी रुपाली भोसले यांना रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्याच्या आधीच त्यांचा मृत्यू झाला होता

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *