• September 12, 2023
  • No Comment

जबरी चोरी करणारे आरोपी येरवडा तपास पथकाकडून जेरबंद

जबरी चोरी करणारे आरोपी येरवडा तपास पथकाकडून जेरबंद

     

    पायी जात असताना स्प्लेंडर मोटार सायकल वरुन तीन अनोळखी इसमांनी फिर्यादी यांचा मोबाईल जबरदस्तीने हिसका मारुन चोरुन नेला आहे म्हणून येरवडा पो.स्टे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    सदर गुन्हयाचा तपास करत असताना रामवाडी मार्शलचे पोलीस अंमलदार संदिप जायभाये व सागर दळवी यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्हयातील आरोपी हा
    कल्याणीनगर भागात येणार आहे. सदरची माहिती मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा पोलीस स्टेशन यांना कळविल्याने त्यांनी मिळालेली माहिती वरुन कारवाई करणेबाबत मार्गदर्शन केले त्याप्रमाणे सर्व्हेलन्स पथकाचे अधिकारी पाोउपनि रविंद्रकुमार वारंगुळे व पोलीस अंमलदार संदिप जायभाये, सागर दळवी,
    दत्तात्रय शिंदे,प्रशांत कांबळे यांनी तेथे जावून संशयीत इसमाला पळून जात असताना अतिशय शिताफीने पकडले.त्यास त्याचे नाव पत्ता विचारता १. दिपक चंद्रकांत मांडगे वय २४ वर्षे रा पठारे ठुबे नगर खराडी पुणे मुळ गाव दनेवाडी ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर २. तुषार बाबासाहेब रसाळ वय २५ वर्षे रा बालाजी नगर चाकण पुणे मुळ गाव दनेवाडी ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर ३. राधाकिसन बबन साठे वय ३० वर्षे रा वनिता झोपडपट्टी गोल्ड जिमसमोर कल्याणीनगर पुणे असल्याचे सांगितले. त्याचेकडे चौकशी करता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. सदर आरोपीस अटक करण्यात आली आहे. त्याचेकडून गुन्हयातील
    चोरीस गेलेला ५,०००/- किंमतीचा मोबाईल मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास
    तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप-निरीक्षक अंकुश डोंबाळे करत आहेत. सदरची कामगिरी मा.पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ – ४, पुणे शहर श्री शशिकांत बोराटे, मा.सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, श्री. संजय पाटील मा. वरिष्ठ पोलिस निरीक्षक येरवडा पो.स्टे, श्री. बाळकृष्ण कदम, पोनि गुन्हे श्रीमती कांचन जाधव, पोनि गुन्हे येरवडा श्री जयदिप गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली
    तपास पथकाचे अधिकारी पोउपनि अंकुश डोंबाळे, सर्व्हेलन्स पथक अधिकारी रविंद्रकुमार वारंगुळे, श्रेणी पोउपनि प्रदिप सुर्वे, पोहवा गणपत थिकोळे, दत्ता शिंदे, तुषार खराडे, पोना किरण घुटे,अमजद शेख,सागर जगदाळे,कैलास डुकरे,प्रविण खाटमोडे पोअं अनिल शिंदे, राहुल परदेशी, सुरज ओंबासे, दत्तात्रय शिंदे,प्रशांत कांबळे, सुशांत भोसले, संदिप जायभाये, सागर दळवी यांनी केलेली आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *