- September 12, 2023
- No Comment
शुभम उर्फ चम्या संजय कांबळे व त्याचे इतर ३ सदस्यांवर मकोका अतंगर्त कारवाई

वंदेमातरम चौक, रामटेकडी, हडपसर, पुणे येथुन त्यांची दुचाकी वरून घरी जेवणा करीता निघाले असता, फिर्यादी यांचे ओळखीचे असलेले शुभम ऊर्फ चम्या कांबळे, इरफान शेख, मंगेश जाधव व पिटर प्रेम्या असे फिर्यादी यांचे दिशेने आले आणि त्यातील इरफान शेख फिर्यादी यांना धक्का देवुन यांचे गाडीची चावी हिसकावुन घेतली व पॅन्टीचे खिश्यात हात घालुन जबरदस्तीने पाकिट काढुन
त्यातील ११००/- रु. घेवुन फिर्यादी यांना लाथाबुक्याने मारहाण व शिवीगाळ करुन धमकी देवुन यांची दुचाकी घेवुन पळून गेले त्याबाबत फिर्यादी यांनी वानवडी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने त्याबाबत वानवडी पोलीस स्टेशन गुन्हा दाखल आहे.
दाखल गुन्हयाचे तपासा दरम्यान सदरचा गुन्हा हा आरोपी नामे १) शुभम उर्फ चम्या संजय कांबळे वय १९ रा. कुंजीरवाडी ता. हवेली जि. पुणे. तसेच स. न. ११० रामटेकडी हडपसर पुणे. ( टोळी
प्रमुख ) ( पाहीजे आरोपी) २) टिल्ली ऊर्फ इरफान गुलाम मोहम्मद शेख वय १९ वर्षे रा. विठ्ठल रखुमाई मंदीराजवळ रामटेकडी हडपसर पुणे. ३) मंगेश रवि जाधव वय. २० वर्षे रा. स.न ११० रामटेकडी हडपसर पुणे. ४) फिटर प्रेम्या ऊर्फ प्रेम अनिल थोरात वय १९ वर्षे रा. नवीन म्हाडा कॉलनी बिल्डिग हडपसर पुणे ( टोळी सदस्य) अ. नं. २ ते ४ यांना केल्याचे निष्पन्न झाल्याने यांना दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.नमुद आरोपी टोळी प्रमुख १) शुभम उर्फ चम्या संजय कांबळे वय १९ रा. कुंजीरवाडी ता. हवेली जि.पुणे. तसेच स.न. ११० रामटेकडी हडपसर पुणे ( टोळी प्रमुख ) ( पाहीजे आरोपी) याने संघटित टोळी तयार केली असुन टोळीचे सदर परिसरात वर्चस्व व दहशत निर्माण व्हावी व त्यातुन गैरवाजवी व आर्थिक व इतर फायदा मिळविणेकरीता गुन्हे केलेले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सदर टोळीने गेल्या १० वर्षात बेकायदेशीरमार्गाने स्वतःसाठी किंवा अन्य कोणत्याही व्यक्ती साठी इतर फायदा मिळविण्याच्या उद्देशाने संघटित गुन्हेगारी
संघटनेचा सदस्य म्हणुन किंवा संघटनेच्या वतीने एकटयाने किंवा संयुक्तपणे हिंसाचाराचा वापर करून किंवा हिंसाचार करण्याची धमकी देवुन किंवा धाकदपटशा दाखवून किंवा जुलूम जबरदस्ती करून किंवा अन्य अवैद्य मार्गाने आपली बेकायदेशीर कृत्य चालू ठेवून, संघटना किंवा टोळी म्हणून संयुक्तपणे संघटित गुन्हेगारी कृत्य
करणारा गट तयार करून स्वतःचे गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व व दहशत निर्माण करण्याकरीता त्यांनी संघटितपणे व वैयक्तीकपणे खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी करणे, बेकायदेशीर घातक शस्त्र जवळ बाळगणे, लुटमार करणे, लोकांना दमदाटी करणे यासारखे गंभीर व हिंसक गुन्हे केलेले आहेत. त्यांचेवर शरीरा विरुध्दचे व माला विरुध्दचे गुन्हे
दाखल असुन त्यांचेवर प्रतिबंधात्मक कारवाई करुन देखील त्यांनी पुन्हा पुन्हा गुन्हे केलेले आहेत. नमुद आरोपीं विरुध्द दाखल गुन्हयांस महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी वाढविण्यासाठी व मान्यता मिळणे बाबतचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक वानवडी पोलीस स्टेशन पुणे श्री. भाऊसाहेब पटारे यांनी मा. पोलीस उप-आयुक्त परीमंडळ – ५ पुणे शहर श्री. विक्रांत देशमुख यांचे मार्फतीने मा. अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री रंजनकुमार
शर्मा यांना सादर केला होता. सदर प्रकरणी छाननी करून वानवडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं ४३० / २३ भादविक ३९२, ३४, आर्म
अॅक्ट ४ (२५) मपोकाक १४२,३७(१) (३) १३५ या गुन्हयास महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन
१९९९ चे कलम ३ (१)(ii). ३ (२), ३ (४) या कलमाचा अंतर्भाव करण्याची मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक
विभाग, पुणे श्री. रंजनकुमार शर्मा यांनी मान्यता दिलेली आहे.
सदर गुन्हयाचा पुढील तपास मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर श्री शाहुराजे साळवे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री. संदीप कर्णिक मा.अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री रंजनकुमार शर्मा, मा. पोलीस उप-आयुक्त परीमंडळ – ५ पुणे शहर श्री विक्रांत देशमुख, मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर, श्री शाहुराजे
साळवे त्यांचे मार्गर्शनाखाली मा वरिष्ठ पोलीस निरीक्षक वानवडी पोलीस स्टेशन पुणे शहर श्री भाउसाहेब पटारे, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री विनय पाटणकर श्रे. पोलीस उप निरीक्षक, ज्ञानदेव शेलार पोलीस अंमलदारअमोल घावटे, उत्तरेश्वर धस, पुनम राणे, हनुमंत कांबळे, दिनेश जाधव सर्व वानवडी पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी कारवाई केली आहे.
मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री रितेश कुमार यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचा कार्यभार घेतल्या नंतर गुन्हेगारी नियंत्राणावर बारकाईने लक्ष देवुन शरीराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे कारणारे व नागरिकां मध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवुन गुन्हेगारीचे समुळ
उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मकोका अंतर्गत केलेली ही ५७ वी कारवाई आहे.




