• September 12, 2023
  • No Comment

वाघोलीत घरफोडी चोरी करणाऱ्या गुन्हेगारास अटक ; तर एक अल्पवयीन ताब्यात; 24 तासात गुन्ह्याची उकल ; गुन्हे शाखा युनिट ६ ची धडाकेबाज कारवाई

वाघोलीत घरफोडी चोरी करणाऱ्या गुन्हेगारास अटक ; तर एक अल्पवयीन ताब्यात; 24 तासात गुन्ह्याची उकल ; गुन्हे शाखा युनिट ६ ची धडाकेबाज कारवाई

     

    पुणे शहरातील जबरी चोरी, घरफोडी व वाहन चोरी या गुन्ह्यांना आळा बसावा या करिता मोहीम राबवून कारवाई करणेबाबत पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी आदेशित केले होते. दिनांक 09/09/2023 रोजी गुन्हे शाखा युनिट ६ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे युनिट हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना *मपोशि 10857 ज्योती काळे व पो अं 8203 सचिन पवार* यांना त्यांचे गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, लोणीकंद पोलीस स्टेशन 736/2023 भा दं वि क 454,457,380 हा गुन्हा इसम नामे ओंकार गोसावी याने केलेला असून तो हडपसर इंडस्ट्रियल इस्टेट येथे थांबलेला असून त्याचेकडे नंबर नसलेली दुचाकी मोटार सायकल आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर माहितीची खातरजमा करुन वपोनि रजनीश निर्मल यांना कळविले असता त्यांनी सदर इसमास ताब्यात घेऊन त्याचेकडे चौकशी करणेबाबत आदेशित केले. पोउप निरीक्षक सुरेश जायभाय यांनी वेगवेगळ्या टीम बनवून सदर इसमास ताब्यात घेऊन नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव *ओंकार सुरेश गोसावी वय 21 वर्षे रा. सहारा प्रेस्टिजजवळ, जगदाळे निवास, भेकराईनगर, फुरसुंगी, पुणे* असे सांगितले. त्याचेकडे वर नमूद गुन्ह्याबाबत चौकशी केली असता तो उडवाउडवीची व असमाधानकारक उत्तरे देऊ लागल्याने त्यास त्याचे ताब्यातील दुचाकीसह ताब्यात घेऊन विश्वासात घेऊन अधिक तपास करता सदरचा गुन्हा त्याने त्याचा साथीदार विधी संघर्षित बालक याचे मदतीने केल्याची कबुली दिली असून तांत्रिक विश्लेषन द्वारे शोध घेत असताना तो फुरसुंगी परिसरात असलेबाबत माहिती मिळाल्याने आरोपी ओंकार गोसावी सह जावून शोध घेतला असता तो फाटे कॉलनी येथे रस्त्याने पायी चालत असलेला मिळून आला. त्यांचे ताब्यातून सोन्या चांदीचे दागिनेची तसेच रोख रक्कम तसेच वेगवेगळ्या कंपनीचे 05 मोबाईल हँडसेट असा एकूण 3,47,400/- रू किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून सदरचा गुन्हा उघडकीस आला आहे.
    सदरची कामगिरी मा. श्री रामनाथ पोकळे (अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे), मा. श्री अमोल झेंडे (पोलीस उप आयुक्त गुन्हे), श्री मा. सतीश गोवेकर (सहा.पोलीस आयुक्त सो गुन्हे 2) या वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल, पो उपनिरीक्षक सुरेश जायभाय, भैरवनाथ शेळके, पो हवा मच्छिंद्र वाळके, पो ना विठ्ठल खेडकर, संभाजी सकटे, रमेश मेमाने, नितीन मुंढे, प्रतीक लाहीगुडे, प्रमोद मोहिते, कानिफनाथ कारखेले, ऋषीकेश व्यवहारे, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश टिळेकर, अशफाक मुलाणी, शेखर काटे, नितीन धाडगे, ज्योती काळे, सुहास तांबेकर पथकाने केलेली आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *