• September 13, 2023
  • No Comment

पुणे शहरात भरदिवसा १४ वर्षीय मुलीचे घरासमोरुन अपहरण पोलिसांनी आरोपींना केली अटक

पुणे शहरात भरदिवसा १४ वर्षीय मुलीचे  घरासमोरुन अपहरण पोलिसांनी आरोपींना केली अटक

    पुणे : पुणे शहरातील गुन्हेगारीवर सर्वत्र चर्चा सुरु आहे. शहरात पोलिसांकडून उपाययोजन करुन गुन्हेगारी कमी होत नाही. मंगळवारी एका १४ वर्षीय मुलीचे अपहरण झाले. त्या मुलीच्या घरासमोरुनच भरदिवसा अपहरण करण्यात आले.अपहरणकर्त्यांनी मुलाच्या वडिलांकडे तब्बल 30 लाखांची खंडणी मागितली. हे प्रकरण सासवड पोलिसांपर्यंत गेले. पोलिसांनी तत्पर कारवाई सुरु केली. आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला

    पोलिसांनी आरोपींना केली अटक
    पुणे शहरातील पिंपरी चिंचवड भागातून १४ वर्षीय मुलाचे अपहरण मंगळवारी सकाळी तिच्या घरासमोरुनच झाले. मंगळवारी सकाळी आरोपींनी काळया रंगाच्या झेन कारमधून हिंजवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून मुलीचे आपहरण केले. त्यानंतर मुलीच्या वडिलांकडे ३० लाखांची खंडणी मागितली. दरोडा विरोधी पथक आणि सासवड पोलिसांनी आरोपी पकडण्यासाठी सापळा रचला. सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपी कुठे गेले ते तपासले. त्यानंतर काही तासांत आरोपींना पकडत मुलीची सुटका केली

    पोलिसांनी तीन आरोपींना सासवड येथून ताब्यात घेतले. या आरोपींकडून पिस्तूल, कोयता, सतुर, कटवणी, लोखंडी, हातोडी अशी हत्यारे जप्त केली गेली. तेजस लोखंडे, अर्जुन राठोड, विलास म्हस्के या आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्यावेळी मुलीचे अपहरण कशासाठी केले होते, हे त्यांनी सांगितले. आईला दवाखान्यात नेण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे आपण हे अपहरण केल्याचे आरोपींनी सांगितले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांचा अधिक तपास सुरु आहे. या आरोपींवर यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत का? याचा शोध पोलीस घेणार आहे. परंतु भरदिवसा झालेल्या या घटनेमुळे खळवळ उडाली आहे

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *