• September 13, 2023
  • No Comment

पुणे इसिस मॉड्युल प्रकरणातील चार वॉटेंड आरोपींवर प्रत्येकी तीन लाखांचे बक्षिस जाहीर

पुणे इसिस मॉड्युल प्रकरणातील चार वॉटेंड आरोपींवर प्रत्येकी तीन लाखांचे बक्षिस जाहीर

    पुणे : पुणे शहरात १८ जुलै रोजी पुणे पोलिसांनी दोन दशतवाद्यांना अटक केली होती. या दोन्ही दहशतवाद्यांचा संबंध इसिसशी असल्याचे तपासातून उघड झाले होते. पुणे शहरात उघड झालेल्या या इसिस मॉड्यूलमुळे खळबळ माजली होती. राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेत तपास सुरु केला. आता एनआयएकडून या प्रकरणातील सर्व आरोपींच्या मुसक्या आवरण्यासाठी जोरदार कारवाई केली जात आहे. या प्रकरणातील चार आरोपींवर लाखो रुपयांचे बक्षिस एनआयएने जाहीर केले आहे.

    चार वॉटेंड आरोपीवर प्रत्येकी तीन लाखांचे बक्षिस
    पुणे इसिस मॉड्युल प्रकरणातील चार वॉटेंड आरोपींवर प्रत्येकी तीन लाखांचे बक्षिस जाहीर करण्यात आले आहे. आरोपींना पकडून देणाऱ्यांना हे बक्षिस दिले जाणार आहे. महमद शहनवाज शफीज उम्मा आलम अब्दुल, रिझवान अब्दुल हाजी अली, अब्दुल शेख फय्याज बायपरवाला, ताला लिवाकत खान असे हे आरोपी आहेत. दहशतवादी संघटनेचा प्रचार आणि प्रसार केल्याप्रकरणी हे चार आरोपी एनआयएच्या वॉटेंडच्या यादीत आहे.

    7 आरोपींना केली अटक
    NIA ने ISIS पुणे मॉड्यूल प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना अटक केली आहे. हे सर्व आरोपी पुणे शहरातील कोंढवामध्ये एका घरात काम करत होते. याठिकाणी त्यांनी आयईडी असेंबल केले होते. तसेच बॉम्ब बनवण्याची कार्यशाळाही घेतली होती. तसेच सातारा जंगलात जाऊन बॉम्बची चाचणी घेतली होती

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *